गोविंदपूर – कळंब तालुक्यातील गोविंदपूर येथील अनंतराव साहेबराव घोगरे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाच्या प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात आले असल्याचे पत्र सेवा दलाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विलास औताडे यांनी दिले असून या पत्रात म्हटले आहे की, अनंतराव घोगरे यांचा अनेक दिवसांपासून काँग्रेस पक्षासोबत सामाजिक कार्यामध्ये असलेला सक्रिय सहभाग काँग्रेस सेवा दलाला बळकटी आणणारा असल्याने अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मलिकार्जुन खर्गे व श्रीमती सोनिया गांधी यांच्या अपेक्षेप्रमाणे काँग्रेस पक्षाचे एक निष्ठेने कर्तव्य बजावणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. हे नियुक्तीपत्र धाराशिव येथे सेवा दलाचे महाराष्ट्र अध्यक्ष विलास औताडे यांनी दिले.याप्रसंगी धाराशिव काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष विलास शाळू,भूम तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गपाट, कुंडलिक माळी,सदानंद फुगारे आदींची उपस्थिती होती. अनंतराव घोगरे यांच्या या नियुक्तीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात