March 26, 2026

डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी

  • कळंब – शहरातील छत्रपती संभाजी महाराज नगर येथील धनेश्वरी शिक्षण समुहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने व प्राचार्य सतीश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सांस्कृतिक सभागृहात माजी राष्ट्रपती,शास्त्रज्ञ,मिसाईल मॅन,राजकारणी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस निदेशिक सागर पालके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
    याप्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके, निदेशिक अविनाश म्हेत्रे,निदेशक विनोद जाधव,निदेशिका कोमल मगर,आदित्य गायकवाड, विनोद कसबे यांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!