कळंब ( साक्षी पावनज्योत )- सध्या खरीप हंगाम सुरु असून पावसानेही चांगली साथ दिली आहे पण बँकाकडून कर्ज पुरवठा करण्यात सहकार्य होत नसल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना व अधिकारी यांना समोरासमोर घेऊन अडचणी सोडविण्यासाठी बँक अधिकारी यांची बैठक दि.२२ जुलै २०२४ रोजी शहरातील पंचायत समितीच्या सभागृहात आमदार कैलास पाटील यांनी वेळेवर कर्जपुरवठा व बँकेच्या इतर समस्यांबाबत बॅंक अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ही बैठक संपन्न झाली.कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप आढावा, शासनाच्या विविध योजनांचे कर्ज प्रस्ताव मंजुरी बाबत अडचणी येत होत्या. यावेळी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन संबंधित बँक अधिकाऱ्यांना आ.कैलास पाटील यांनी सूचना दिल्या तसेच शेतकऱ्याने पिक कर्जाचे पुनर्गठन करून घेतल्यानंतर त्यांना ४ दिवसात कर्ज उपलब्ध करुन देण्यात यावे. ज्या खातेदाराचे खाते होल्ड केलेले आहे ते खातेदार संबंधीत व्यवस्थापक यांच्याकडे आले असता तात्काळ होल्ड काढण्यात यावे. बँकांना दिलेले पीक कर्जाचे उद्दीष्ठ लवकरात लवकर (१००%) पूर्ण करण्यात यावे. तसेच गरजू लाभार्थ्यांना कमीत कमी कागदपत्रांद्वारे सहजरीत्या पीककर्ज उपलब्ध करून देण्या संदर्भातही सर्व बँक व्यवस्थापक यांना निर्देश देण्यात आले. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक निलेश विजयकर , गटविकास अधिकारी चकोर , तालुक्यातील सर्व बँकाचे व्यवस्थापक,सरपंच,शेतकरी, पदाधिकारी,शिवसैनिक उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले