August 9, 2025

मागासवर्गीय महिलांना 100 टक्के अनुदानावर शिलाई कम पिको-फॉल मशिन

  • धाराशिव (जिमाका) – जिल्हा परिषद स्वसंपादीत उत्पन्नातील 20 टक्के समाज कल्याण सेस योजनेअंतर्गत सन 2024-2025 या आर्थीक वर्षाकरीता समाज कल्याण विभागाकडून मागासवर्गीय महिलांना शिलाई कम पिको-फॉल मशिनकरिता 100 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
    जिल्हयातील ग्रामीण भागातील ज्या मागासवर्गीय महिलांना या योजनाचा लाभ घ्यावयाचा आहे,त्यांनी विहीत नमुन्यातील परिपुर्ण प्रस्ताव गटविकास अधिकारी,पंचायत समिती यांच्यामार्फत जिल्हा समाज कल्याण अधिकारी,समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद,धाराशिव यांच्याकडे 31 जुलै-2024 अर्ज करावे.
    अर्जाचा विहीत नमूना अटी नियम सोबत जोडावयाची कागदपत्रे गटविकास अधिकारी,पंचायत समिती (सर्व) येथे उपलब्ध करण्यात आला आहे.तसेच धाराशिव NIC (dharashiv.nic.in) व www.zpdharashiv.gov.in या संकेतस्थळावर अर्जाचे नमुने उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद धाराशिव यांनी दिली.
error: Content is protected !!