कळंब – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव संभाजी शिंदे यांची वर्षा निवासस्थानी युवा सेना राज्य समन्वयक तथा शिवसेना धाराशिव जिल्हा निरीक्षक नितीन लांडगे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ यांचे शिष्टमंडळ यांनी मुंबई येथे भेट घेतली ही भेट दिनांक २९ जून रोजी कळंब येथे कार्यरत असलेले एसटी कर्मचारी सच्छिदानंद पुरी यांनी टॉवरवर चडून केलेल्या आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री आणि पुरी यांचे मोबाईल फोन वरून बोलणे लांडगे यांनी करून देवून आंदोलनकर्ते पुरी यांनी मुख्यमंत्री यांच्या शब्दाखातर आंदोलन स्थगित करून भेट घेण्याचे ठरले आणि ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्री यांची भेट झाली सदरील भेटीदरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचे विविध विषय मार्गी लावण्याचे आवाहन शिष्टमंडळातर्फे करण्यात आले.या आवाहनाला मुख्यमंत्री यांनी पूरक आणि प्रशासकीय चर्चेतून मार्ग काढणार असल्याचे वचन सर्व एसटी कर्मचाऱ्यांना व शिष्टमंडळ यांना दिले तसेच सदरील भेटीचे पूर्व नियोजन करणारे मा. नितीनजी लांडगे यांचे देखील आभार एसटी कर्मचाऱ्यांनी मानले. यावेळी उपस्थित संजय मुंदडा, युवासेना जिल्हाप्रमुख गणेश जगताप,युवा सेनेचे जिल्हा सरचिटणीस निखिल घोडके समवेत युवा सैनिक उपस्थित होते.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन