कळंब – ज्ञानदा बहुउद्देशीय सामाजिक संस्था व संत ज्ञानेश्वर बालकाश्रम कळंब यांच्या वतीने संत ज्ञानेश्वर बालकाश्रम येथे दिनांक १८ जुलै रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊसाहेब देशमुख,ज्येष्ठ नागरिक महासंघाचे मराठवाडा विभाग सचिव डी.के. कुलकर्णी,संत ज्ञानेश्वर बालकाश्रमाचे संचालक ह.भ. प. महादेव महाराज अडसूळ ,लसाकम संघटनेचे संघटक बापू भंडारे यांनी पुष्पहार अर्पण केला व अभिवादन केले याप्रसंगी अध्यक्षीय समारोपात भाऊसाहेब देशमुख यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी उपेक्षित वंचित घटकांना समोर ठेवून वास्तववादी लेखनातून साहित्य निर्मिती केली महापुरुषांचे समाजासाठी असलेले योगदान विसरता कामा नये असे सांगितले. याप्रसंगी डी. के. कुलकर्णी, ह.भ. प.महादेव महाराज अडसूळ,बापू भंडारे यांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमास विकास गायकवाड,सतीश तोडकर ,बाळासाहेब कांबळे, विक्रम भंडारे,विठ्ठल पुटेवार ,प्रशांत निन्हाळ,उद्धव काळे, पप्पू मडके, पोपट साळवे, किशोर मगर यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक ज्ञानदा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष बंडू ताटे यांनी सूत्रसंचालन माधवसिंग राजपूत यांनी तर आभार सचिन क्षिरसागर यांनी मानले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले