कळंब – तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथर्डी येथे बाळगोपाळांची आषाढी एकादशीच्या निमित्ताने शिक्षणा बरोबर संस्कारांची जोड असावी या हेतूने दिंडी सोहळा, ग्रंथ दिंडी मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रुक्मिणी,संत नामदेव,संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर,संत जनाबाई, वारकरी, मावळा इत्यादी वेशभुषा केल्या होत्या.विधीवत विठ्ठल रुक्मिणी च्या प्रतिमेची पुजा वारकरी पाथर्डी गावातील जेष्ठ भजनी मंडळींच्या शुभहस्ते करण्यात आली.शाळेच्या वतीने उपस्थित भजनी मंडळीचा शिक्षक धनंजय गव्हाणे यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.देशातील अगळवेगळ महत्त्व असणार्या महाराष्ट्रातील विठ्ठल रुक्मिणी दिंडी सोहळ्याचे माहात्मे मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांनी सांगितले .या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी शिक्षक धनंजय गव्हाणे,मनिषा पवार, सरोजिनी पोते, सुरेखा भावले यांनी परिश्रम घेतले.या दिंडी सोहळ्यात बहुसंख्येने भजनी मंडळ, ग्रामस्थांची उपस्थिती होती.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी