June 21, 2025

धाराशिव जिल्हा पोलीस नामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.13 जैुल रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 195 कारवाया करुन 1, 66, 100 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • वाशी पोलीस ठाणे: आरोपी नामे-कालीदा लक्ष्मण पवार, वय 45 वर्षे, रा. लोणखस पारधी पिढी ता. वाशी, जि. धाराशिव हे दि. 13.07.2024 रोजी 17.20 वा. सु. लोणखस पारधी पिढी येथे अंदाजे 1,700 ₹ किंमतीची 20 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमुद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम65(ई)अन्वये वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • ढोकी पोलीस ठाणे: आरोपी नामे-सलीम सजिर कोरबु, वय 48 वर्षे, र. तेर ता. जि. धाराशिव हे दि. 13.07.2024 रोजी 17.50 वा. सु. वाणेवाडी रोडवर जनता धाबा येथे अंदाजे 2,735 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 15 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमुद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम65(ई)अन्वये ढोकी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • कळंब पोलीस ठाणे: आरोपी नामे-दत्ता अनुरथ वरपे, वय 34 वर्षे, रा. मस्सा खं ता. कळंब जि. धाराशिव हे दि. 13.07.2024 रोजी 17.40 वा. सु. मस्सा खं. येथे अंदाजे 2,130 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 15 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमुद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम65(ई)अन्वये कळंब पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • लोहारा पोलीस ठाणे: आरोपी नामे-नागनाथ मारुती सोनटक्के, रा. कानेगाव ता. लोहारा जि. धाराशिव हे दि. 13.07.2024 रोजी 19.30 वा. सु. कानेगाव येथे अंदाजे 1,120 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 14 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमुद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम65(ई)अन्वये लोहारा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • येरमाळा पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान येरमाळा पोलीसांनी दि.13.07.2024 रोजी 19.00 वा. सु. येरमाळा पो.ठाणे हद्दीत येरमाळा बसस्थानक लगत पत्रयाचे शेडमध्ये छापा टाकला. यावेळी आरोपी नामे- प्रदीप सदाशिव बाराते, वय 28 वर्षे, रा. बारातेवाडी ता. कळंब जि. धाराशिव, विशाल अर्जुन क्षिरसागर, वय 32 वर्षे, रा. संभाजी नगर येरमाळा, मंजुर शमशुद्दीन पटवेकर, वय 56 वर्षे रा. आदर्श नगर वाशी ता. वाशी हे 19.00 वा. सु. येरमाळा बसस्थानकलगत पत्र्याचे शेडमध्ये मिलन नाईट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 24,630 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले येरमाळा पो.ठा.च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये येरमाळा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद.”
  • येरमाळा पोलीस ठाणे :आरोपी नामे-1) रामा शिवाजी काळे, वय 34 वर्षे, रा. तेरखेडा ता. वाशी जि.धाराशिव, तसेच 2)अलिम हुसेन बागवान, वय 33 वर्षे र. खाजानगर तालीम गल्ली ता. जि. धाराशिव, तसेच 3) राजकुमार विश्वनाथ खरोसे, वय 54 वर्षे, रा. खानापुर ता. वाशी जि. धाराशिव, तसेच 4)पोपटराव साहेब पवार, वय 40 वर्षे, रा. लक्ष्मी पारधी पिढी ता. वाशी जि. धाराशिव, तसेच 5)दिगंबर विश्राम पवार, वय 60 वर्षे, रा. लक्ष्मीपारधी पिढी तेरखेडा ता. वाशी जि. धाराशिव, तसेच 6)शिवाजी बिश्राम पवार, वय 32 वर्षे, रा. तेरखेडा ता. वाशी जि. धाराशिव, तसेच 7) योगीराज कल्याण माडेकर, वय 34 वर्षे, रा. येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव, तसेच 8)ईस्माईल मुस्ताफा सय्यद, वय 50 वर्षे, रा. येडशी ता.जि. धाराशिव, तसेच 9)जिलानी दगडु सय्यद, वय 45 वर्षे, रा. भाटशिरपुरा ता. कळंब जि. धाराशिव, तसेच 10)चंद्रकांत संभाजी चौरे, वय 28 वर्षे, रा. भुम ता. भुम जि. धाराशिव हे सर्वजनांनी दि.13.07.2024 रोजी 13.00 ते 15.00 वा. सु. आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे ॲपे रिक्षा क्र एमएच 25 एन 1038, ॲपेरिक्षा क्र एमएच 25 एके 1356, पिकअप क्र एमएच 08 डब्ल्यु 3695,ॲपेरिक्षा क्र एमएच 25 ई 8248, ॲपे रिक्षा क्र एमएच 23 एच 9805, ॲपे रिक्षा क्र एमएच44-4813, किरणा दुकान व हॉटेल तेरखेडा ब्रीजखाली व आठवडी बाजार तेरखेडा येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना येरमाळा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285अन्वये येरमाळा पो.ठा. येथे स्वतंत्र 10 गुन्हे नोंदवले आहेत.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे: फिर्यादी नामे- सुनंदीनी नवीनकुमार मेंढा(मनका), वय 39 वर्षे, रा. पायोनेर बाजार बोलाराम सिकंदराबाद राज्य- तेलंगणा या व त्यांचे नातेवाईक असे देवदर्शनासाठी शिर्डी येथे ईनोव्हा गाडीने जात असताना दि. 18.05.2024 रोजी 23.30 वा. सु. येडशी टोलनाका येथे फ्रेश होवून येत असताना अज्ञात व्यक्तीने सुनंदीनी मेंढा यांचे गळ्यातील अंदाजे 1,80,000₹ किंमतीची 6 तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुनंदीनी मेंढा यांनी दि.13.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ फसवणुक.”
  • तुळजापूर पोलीस ठाणे: आरोपी नामे- सुदर्शन बाबर हजारे, रा. गडदेवधरी ता. जि. धाराशिव यांनी दि. 09.09.2023ते दि. 22.02.2024 या कालावधीत भारत फायनान्शियल इनक्लयुजन लि. इंडुसलॅन्ड बॅक तुळजापूर यांचे कडून बचत गटाच्या 88 महिलांकडून रकृकम 13,49,507₹ बॅकेचे ऑफीसमध्ये जमा करतो म्हणून स्वताकडे ठेवून घेवून ऑफीसमध्ये जमा न करता बॅकेची फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मिथुन अंकुशराव राठोड, वय 33 वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी, रा. गोवर्धन हिवरा जि. बिड ह.मु. हडको तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.13.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भ.दं.वि.सं. कलम 406, 420 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल.”
  • तामलवाडी पोलीस ठाणे: आरोपी नामे-यशवंत शिवाजी खेडकर, रा. वंजारवाडी, ता. बारामती जि. पुणे, सतिश किसन कदम, रा. कटफळ ता. बारामती जि पुणे, भारत शिवाजी खेडकर, रा. वंजारवाडी ता. बारामती जि. पुणे, अंबादास सुखदेव नागवडे रा. घोडेगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर यांनी दि. 13.07.2024 रोजी 16.25वा. सु. तामलवाडी टोलनाका येथे फिर्यादी नामे-जेजरथ उत्तरेश्वर कोळी, वय 53 वर्षे, व्यवसाय- एस.टी. चालक क्र 1491 भुम आगार रा. गोरमाळा ता. भुम जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी फिर्यादी हे बस थोडी पुढे घेत असताना नकळत मागे आल्याने मागील उभे असलेल्या गाडी क्र एमएच 42 बीजी 3760 एमएच 42 एक्यु 2564, एमएच 42 बीजे 7600 मधील नमुद आरोपींनी बसमध्ये चढून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जखमी केली. व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- जेजरथ कोळी यांनी दि.13.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो ठाणे येथे भारतीय न्याय सहिंता कलम 132, 121(1), 352, 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मारहाण.”
  • तुळजापूर पोलीस ठाणे: आरोपी नामे-दादाराव उर्फ विजय विजय गजेंद्र मुंडफणे, समर्थ सुधीर भोसले उर्फ मुंडफणे, नितीन हाबु, पिंटु कैकाडी चौघे रा. ढेकरी ता. तुळजापूर, कुमार उर्फ छक्कु गायकवाड, आदित्य उर्फ सोनु नन्नवरे दोघे रा हंगरगा तुळ पाटी ता. तुळजापुर जि. धाराशिव यांनी दि. 20.06.2024 रोजी 11. 00 वा. सु. ढेकरी येथे फिर्यादी नामे- दत्तोबा रावजी भोसले, वय 48 वर्षे, रा.भोसले गल्ली शुक्रवार पेठ तुळजापूर जि. धाराशिव यांना व त्यांचा मेव्हुना सुरेश नेपते यांना नमुद आरोपींनी शेतीच्या वादाचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठी, सत्तुर, लोखंडी रॉड, गजाने माराहण करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-दत्तोबा भोसले यांनी दि.13.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भ.दं.वि.सं. कलम 326, 327, 323, 427, 504, 506, 143, 147, 148, 149 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • बेंबळी पोलीस ठाणे: आरोपी नामे-मेघराज सुरेश कचरे, प्रेमराज सुरेश कचरे, रा. गोगाव ता. जि. धाराशिव यांनी दि.12.07.2024 रोजी 12.15 ते 12.30 वा. सु. गोगाव भंडारी येथे शेतात फिर्यादी नामे-निलेश विनायक सुर्यवंशी, वय 38 वर्षे, रा. नांदुर्गा ता. जि. धाराशिव यांना कुत्रयाने कोंबड्या खाल्या या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कुह्राडीचा दांड्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले.व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-निलेश सुर्यवंशी यांनी दि.13.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथे भारतीय न्याय सहिंता कलम 117 (2), 115(2), 352, 351(1) (3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “अपघात.”
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे: आरोपी नामे- गणेश भिमराव पवार, रा. फकीरानगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.15.04.2024 रोजी 12.00 वा. सु.एम.एस.ई. बी. कार्यालय यांनी बांधकाम करुन नये यासाठी त्यांना नोटीस दिली असता नमुद आरोपींनी जाणुन बुजुन आदेशान्वये उल्लंघन करुन हयगयीने व निष्काळजीपणे यातील मयत नामे- जावेद रमजान मुजावर, वय 28 वर्षे, रा. खॉजानगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांना बांधकामास प्लास्टर करण्यास लावून त्यांचे मरणास कारणीभुत झाला. वगैरे आ.मृ नं 21/2024 कलम 174 सीआरपीसी चे तपासात निष्पन्न झाल्याने फिर्यादी नामे- सोनम जावेद मुजावर, वय 27 वर्षे, रा. खॉजानगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.13.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम 304 (अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
error: Content is protected !!