परभणी – कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या १२१ व्या जयंती निमित्त दि.२० ऑक्टोबर २०२३ रोजी जमिन अधिकार आंदोलन,परभणीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर येथे गायरान कास्तकाऱ्यांचा भुमिहक्क सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र लोकविकास मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा जमिन अधिकार आंदोलनाचे विश्वनाथ (आण्णा) तोडकर हे आहेत तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जयकिसान आंदोलन महाराष्ट्राचे कॉ.सुभाष भाऊ लोमटे तर प्रमुख पाहुणे हे लालसेनेचे गणपत भिसे हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास सदभावना मंच,जिल्हाध्यक्ष तथा समाजवादी जन परिषदचे आप्पाराव मोरताटे,डॉ. सुनिल जाधव हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी खालील प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत.कास्तकार गायरानधारकांना विनाअट गायरान व वंजनी जमिनीचा ७/१२ नक्कल देण्यात यावी,कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजने अंतर्गत गायरान जमिनी कास्तकारांना देण्यात याव्यात,गायरानधारकांनी वहिती केलेल्या गायरान जमिनिवरील पेरलेल्या पिकांची नोंद घेवून पंचनामा करून १ ई. ला नोंद घेण्यात यावी, गायरान धारकांना शेतकऱ्यांप्रमाणे शासनाच्या पिक विमा, पिक कर्ज,पिक नुकसान भरपाई आदि योजनांचा लाभ देण्यात यावा, मागासवर्गीय गायरान कास्तकारी धारक यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर सिचंन योजनाची विहीर देण्यात यावी व वीज पुरवठा देण्यात यावा, गायरान व वनजमिनीवर शेतीसाठी अतिक्रमन असेल तर त्यावर शासनाने वनिकरण करू नये,समतेच्या न्यायासाठी जमिनीचे समान वाटप करा. या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक हे जमिन अधिकार आंदोलन, परभणीचे विश्वनाथ गवारे हे असून संयोजन समितीत मुगाजी बुरड, ज्ञानेश्वर मोरे, बंडू गायकवाड, अंकुश तांबे, शिवाजी कांबळे, नितिन कुमार वैराळ, विजयाताई गायकवाड, निर्मला भालके लखण डफाडे, उत्तम गोरे, रूस्तुम पारडे, अशोक उबाळे, मरजी सोनवणे, रमेश जोगदंड, अमर गालफाडे, ज्ञानेश्वर भराड, गणेश उफाडे आदी आहेत तर या कार्यक्रमास सर्व गायरान धारकांना आप आपल्या गायरान जमिनीत पेरलेल्या पीकाचे धान एक एक झाड कलेक्टरला दान करण्यासाठी सोबत घेवून यावे असे आवाहन आवाहन अमर गालफाडे, सुनिल सुतारे यांनी केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात