मोहा – जिल्हा परिषद धाराशिव व युनानी दवाखाना मस्सा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१३ जुलै २०२४ रोजी शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मोहा येथील ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात योग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. योगगुरु आशिष झाडके यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. सकाळच्या अल्हाददायक वातावरणात व विद्यालयाच्या निसर्गरम्य परिसरात अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी योग प्रशिक्षण घेतले. या अंतर्गत प्राणायाम तसेच विविध आसने व ध्यान याचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक योगगुरु आशिष झाडके यांनी करून दाखवले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्राचार्य संजय जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक सुनील साबळे, क्रीडाशिक्षक संजय मडके, प्रा.नवनाथ करंजकर,प्रा.राहुल भिसे, सहशिक्षक सतीश मडके, प्रा. प्रतिभा सावंत आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात