August 9, 2025

जि.प.सेस अंतर्गत मतिमंद व्यक्ती व अतितीव्र दिव्यांगाच्या पालकांसाठी अर्थसहाय्य योजना

  • धाराशिव (जिमाका) – जिल्हा परिषद स्वसंपादीत उत्पन्नातील 5 टक्के दिव्यांग सेस योजनेअंतर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरीता समाज कल्याण विभागाकडून मतिमंद व्यक्तींना आणि अतितीव्र दिव्यांगांच्या पालकांना अर्थसहाय्य करण्याची योजना राबविण्यात येत आहेत.
    जिल्ह्यातील ज्या दिव्यांग लाभार्थींना या योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे, त्यांनी विहीत नमुन्यातील परीपूर्ण प्रस्ताव गटविकास अधिकारी,पंचायत समिती यांच्यामार्फत जिल्हा समाज कल्याण अधिकारी,समाज कल्याण विभाग,जिल्हा परिषद,धाराशिव यांच्याकडे 25 जुलै 2024 पर्यंत सादर करावे.असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी देवदत्त गिरी यांनी केले आहे.
  • अर्जाचा विहीत नमुना,अटी,नियम व सोबत जोडावयाची कागदपत्रे गटविकास अधिकारी,पंचायत समिती (सर्व) येथे उपलब्ध आहे.तसेच dharashiv.nic.in आणि जिल्हा परिषदेच्या www.zpdharashiv.gov.in या संकेतस्थळावर अर्जाचे नमुने उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
error: Content is protected !!