कळंब – शिवसेवा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित छ.शिवाजी महाविद्यालय,कळंब व राष्ट्रीय सेवा योजना विभाग व उपजिल्हा रुग्णालय कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.11जुलै 2024 रोजी. शिवाजी कापसे(सचिव,शिवसेवा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट कळंब) व सभापती (कृषी उत्पन्न बाजार समिती,कळंब)यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर,वृक्षारोपण या कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाविद्यालयात करण्यात आले आहे. वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य शिबिरात विविध प्रतिबंधात्मक आरोग्य तपासण्या करण्यात येणार आहे.या सामाजिक उपक्रमात जास्तीत जास्त लोकांनी आरोग्य शिबिरात येऊन तपासणी करून सहकार्य करावे.असे आवाहन प्राचार्य.शशिकांत जाधवर, डॉ.एन.एस.धर्माधिकारी (वैद्यकिय अधिक्षक : उपजिल्हा रुग्णालय कळंब) व रासेयो विभाग प्रमुख प्रा.सौ.मनिषा कळसकर, डॉ.उद्धव गंभिरे व प्रा.शफीक चौधरी यांनी केले. आरोग्य शिबिराचे आयोजन छत्रपती शिवाजी महाविद्यालय कळंब येथे करण्यात आले असून. स.10 ते दु.1वा.पर्यंत आरोग्य शिबिर सुरू राहणार आहे.याची सर्वांनी नोंद घ्यावी.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!
विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश