August 9, 2025

सुरक्षा पर्यवेक्षक व सुरक्षा रक्षकासाठी भरती

  • धाराशिव (जिमाका) – धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे कंत्राटी पद्धतीने माजी सैनिक महामंडळ मर्या (मेस्को), पुणे तर्फे सुरक्षा पर्यवेक्षक व सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावयाची आहे. आकर्षक मासिक पगार, दर सहा महिन्याला वाढीव माहागाई भत्ता, कामगार कायद्यानुसार ई.पी.एफ., ई.एस.आय. ग्रॅज्युएटी आदी यांचे फायदे मिळणार आहेत. माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, माजी सैनिक पाल्य व निमलष्करी सेनामधील निवृत्त कर्मचाऱ्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे आपल्या सर्व मूळ कागदपत्रासह 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे संपर्क साधवा. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 02472-222557, ७५८८५२७५५४ आणि गंगाधर गायकवाड 9422307593 यांच्याशी संपर्क साधावा.
error: Content is protected !!