कळंब – बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी कळंब शहरांतून प्रकाशित होणारे सा.साक्षी पावन ज्योतचे उपसंपादक अरविंद शिंदे यांची दि.५ जुलै २०२४ रोजी रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीने २०२४-२५ या रोटरी वर्षासाठी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीने आपले नवीन संचालक मंडळ जाहीर केले आहे. या संचालक मंडळात अरविंद अभिमन्यू शिंदे यांची अध्यक्ष म्हणून तर सामाजिक कार्यकर्ते नृसिंह ट्रेलर्सचे अशोक विठ्ठल काटे यांची मानद सचिव म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीची स्थापना २००९ साली झाली आहे. गेल्या १४ वर्षापासून हा क्लब रोटरीचे उद्दिष्टे साधत समाजाच्या कल्याणासाठी अविरत कार्यरत आहे.क्लबने विविध सामाजिक उपक्रमाद्वारे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचविण्याचा संकल्प केला आहे . नवीन संचालक मंडळात पुढील सदस्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे.अध्यक्ष अरविंद अभिमन्यू शिंदे,सचिव अशोक विठलराव काटे,संजय घुले , संजय देवडा,रवी नारकर,साजेद चाऊस,रवी नरहिरे,डॉ.अभिजित जाधवर,डॉ.गिरीश कुलकर्णी, डॉ. सचिन पवार,डॉ. सुयोग काकाणी,किरण चव्हाण,निखिल भडंगे,अभिजित भिसे,सुशील तीर्थकर,अमोल लोढा,विश्वजीत ठोंबरे,पंडित दशरथ,श्याम जाधवर,दत्तात्रय टोनगे, धर्मेंद्र शहा यांची निवड करण्यात आली आहे. रोटरी क्लबच्या माध्यमातून आगामी काळात विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबवण्यात येणार आहेत वंचितासाठी,दिव्यांगसाठी,महिला सक्षमीकरणासाठी , शिक्षकासाठी ,विद्यार्थ्यांसाठी, खेळासाठी,वृक्षलागवडसाठी,आरोग्यासाठी, शेतकऱ्यांसाठी,पिन्याच्या पाण्यासाठी आशा विविध योजना रोबविण्यात येणार असल्याचे रोटरी क्लब चे नव निर्वाचित अध्यक्ष अरविंद शिंदे व सचिव अशोक काटे यांनी संगीतले. रोटरी क्लबच्या या नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन