August 9, 2025

ज्ञान प्रसारच्या सोहन साळुंखे याचा सत्कार

  • मोहा – धाराशिव येथे झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील खेळाडू सोहन साळुंखे याने गोळा फेक या क्रिडाप्रकारामध्ये जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेसाठी त्याची निवड झालेली आहे. या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन संस्थेचे सचिव डॉ अशोकदादा मोहेकर, ज्येष्ठ संचालक तात्यासाहेब पाटील तसेच संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेशभाऊ मोहेकर यांनी केले आहे. यानिमित्त यशस्वी विद्यार्थ्याचा तसेच क्रिडा शिक्षक संजय मडके यांचा सत्कार मुख्याध्यापक तथा प्राचार्य संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेशभाऊ मोहेकर, उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा. सुनील साबळे तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नवनाथ करंजकर यांनी केले.
error: Content is protected !!