धाराशिव – डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव चव्हाण यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा.डाॅ.प्रशांत दीक्षित यांचे हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पुजन करण्यात आले. उपस्थित सर्वांनी प्रतिमेस पुष्प अर्पण केले. यावेळी सहाय्यक कुलसचिव भगवान फड, कक्ष अधिकारी विद्याधर गुरव, विद्यार्थी विकास विभाग समन्वयक डाॅ.विक्रम शिंदे, कमवा व शिका योजना समन्वयक डाॅ. गोविंद कोकणे, व्यवस्थापनशास्त्र विभागप्रमुख डाॅ.सुयोग अमृतराव, वरीष्ठ सहाय्यक श्रीकांत सोवितकर, ग्रंथालय सहाय्यक मल्लिनाथ लामजणे, वरिष्ठ सहाय्यक संजय जाधव, शिवाजी माने, चंद्रकांत आनंदगावकर, विश्वास कांबळे, कार्यालयातील कर्मचारी अशोक लोंढे,प्रमोद इंगळे, मस्के, विठ्ठल कसबे, दशरथ कवडे, शिवाजी वाघमारे, इ. उपस्थित होते.
More Stories
अखिल भारतीय महापशुधन एक्स्पो २०२६ च्या लोगोचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते अनावरण
निवडणुकीत ७ लक्ष ४७ हजार ३७० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन