कळंब – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे पदाधिकारी सेवा दल सेलचे जिल्हाध्यक्ष सतीश घोडेराव आणि परंडा तालुका उपाध्यक्ष अतुल गोफणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट ) चा पक्षाचा झेंडा थेट राजधानी श्रीनगर मध्ये फडकावला आहे. यासाठी जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन व जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांच्या कामावर विश्वास ठेवत आज अजित दादा गटामध्ये सक्रिय काम करीत आहेत. त्यांनी या केलेल्या कामाबद्दल सतीश घोडेराव व अतुल गोफणे यांचे पक्षातील जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे तसेच सर्व नेत्यांच्या वतीने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे व यामुळे पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांना आणखीन काम करण्याचे बळ मिळाले आहे असे मत जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांनी व्यक्त केले आहे.
More Stories
निवडणुकीत ७ लक्ष ४७ हजार ३७० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक