August 9, 2025

प्रविण आंबीलकर यांना सर्वोत्कृष्ट पर्यावरण संरक्षण राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार २०२४ जाहीर

  • यवतमाळ (संजय कांबळे यांजकडून ) – भगवान गौतम बुद्धांचा वैशाखी पौर्णिमा उत्सव २०२४ आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची १५० वी जयंती व राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ ‘भारतीय सामाजिक समानता’ या विषयावर सातवी राष्ट्रीय परिषद २६ जुन २०२४ ला दिल्ली येथे आयोजित केली आहे, या परिषदेत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी प्रविण आंबीलकर यांना Best Environmental protection national Excellence Award
    ने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रविण आंबीलकर देशातील सर्वात मोठे सामाजिक संस्था व सामाजिक कार्यकर्ते यांचे संघटन असलेले भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ (भारत) चे कृषी व पर्यावरण संरक्षण विभाग प्रमुख असून ॲग्रीप्लेम फार्मर्स प्रोडुसर कंपनी लिमिटेड चे संचालक तसेच वास एक्सपोर्ट इनपोर्ट कंपनी चे जनरल मॅनेजर आहेत
    भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ (भारत) अंतर्गत समृद्ध महिला प्रकल्प सुरू असून या प्रकल्पाचा उद्देश महिला ना आर्थिक सामाजिक आणि राजकीय सक्षमीकरण करण्याचा असून या प्रकल्पा व्दारा महिला ना शेद्रीय शेती नैसर्गिक शेती शेती व्यवस्थापन तसेच समृद्ध महिला प्रकल्पातील महिला शेतकरी महिला ना एकत्र करून शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करुन महिला चे शेतीच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण्या बरोबर पर्यावरण संरक्षण करण्यासाठी काम करत आहेत. भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ (भारत) वतीने विविध ठिकाणी शेतकरी महिला नी उत्पादन केलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी प्रयत्न करतात त्यांचे कृषी व पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य पाहता महासंघाच्या केंद्रीय कोअर कमिटी आणि महासंघाच्या पुरस्कार निवड समितीने त्याची Best Environmental protection national Excellence Award २०२४
    करिता निवड केली आहे. या परिषदेला केंद्रीय राज्यमंत्री मंत्री रामदास आठवले,माजी मंत्री मा. लक्ष्मण ढोबळे,खासदार धर्यशिल मोहिते पाटील, गोयल गुरूजी, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु पठान,अमरावती चे खासदार वानखेडे, भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संजय कांबळे, किशोर मखवाना, अध्यक्ष एससी आयोग भारत सरकार तसेच अधिकारी व पदाधिकारी आणि भारतातील नामांकित मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहतील,या यशाचे श्रेय त्यांनी भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ (भारत) चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संजय कांबळेव सहकारी यांना दिले असे भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ (भारत) चे केंद्रीय संघटक व पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्रा. गोरख साठे यांनी कळविले.
error: Content is protected !!