धाराशिव (जिमाका) – राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे यांच्यामार्फत शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी डी.एल.डी.(D.El.Ed) प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 18 जून 2024 रोजीपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु बऱ्याच संस्था,लोकप्रतिनिधी व संघटनांनी मागणी केल्यामुळे अर्ज भरण्यासाठी 25 जून 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतच्या सर्व सूचना व प्रवेश पात्रतेची माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.तसेच ऑनलाईन अर्ज भरल्यानंतरचे फेरीनिहाय सविस्तर सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांनी व शैक्षणिक संस्थांनी वेळोवेळी संकेतस्थळ पाहण्याची दक्षता घ्यावी.असे आवाहन राज्यस्तरीय डी.एल.एड प्रवेश निवड, निर्णय व प्रवेश संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र, पुणेचे संचालक राहूल रेखावार यांनी केले आहे.
More Stories
निवडणुकीत ७ लक्ष ४७ हजार ३७० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक