August 9, 2025

वसतीगृहापासून वंचित धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वयंम योजना

  • धाराशिव (जिमाका) – धाराशिव नगर पालिका / शहराच्या ठिकाणी शासकीय तसेच अनुदानित महाविद्यालयात उच्च शिक्षण घेत असलेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 12 वी नंतरच्या मान्यता प्राप्त तंत्रशिक्षण व व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना “ पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन घेण्याकरीता विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट रक्कम वितरीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
    त्यानुसार वरील अभ्यासक्रमात प्रवेशित विद्यार्थ्यांकडून अटी व शर्तीनुसार अर्ज मागविण्यात येत आहे.या योजनेचा विहीत नमुन्यातील अर्ज सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय,धाराशिव येथे उपलब्ध आहे.
    तरी धनगर समाजातील पात्र व गरजू विद्यार्थ्यांनी स्वयंम योजनेचा लाभ घेण्यासाठी 20 जून ते 19 जुलै 2024 या कालावधीत सहाय्यक संचालक,इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,धाराशिव येथे अर्ज करावे. असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक बाबासाहेब अरवत यांनी केले आहे.
error: Content is protected !!