कळंब – मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे दिनांक ८ जून २०२४ पासून सरकारने दिलेल्या शब्दाप्रमाणे सगळे सोयरे अध्यादेश काढावा या इतर मागण्यासाठी अमरण उपोषण करीत आहेत. उपोषणाचा चौथा दिवस असून त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. सरकारने याची तात्काळ दखल घेऊन त्यांचे उपोषण सोडण्याचा प्रयत्न करावा अन्यथा सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कळंब उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत पाठवलेल्या निवेदनात केली आहे. या निवेदनावर सकल मराठा समाजाच्या वतीने अतुल गायकवाड ,अॕड,मनोज चोंदे, संजय होळे ,बालाजी मुळे, अशोक चोंदे ,प्रवीण जाधव, राहुल यादव,संतोष चव्हाण, प्रतीक गायकवाड,विशाल पवार ,विकास गडकर,पंडित गोडगे,नितीन काळे ,मीरा चोंदे ,ज्योती सपाटे यांच्या सह्या आहेत.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन