- धाराशिव (जिमाका) – सर्वोच्च न्यायालय,नवी दिल्ली येथे 29 जुलै ते 03 ऑगस्ट या कालावधीमध्ये विशेष लोक अदालत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.लोक अदालतीमध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवले जाणार आहेत.
जिल्हयातील ज्या पक्षकारांची प्रकरणे सर्वोच्य न्यायालयात प्रलंबित आहेत, ती तडजोडीने मिटावी अशी ज्यांची इच्छा असेल ती प्रकरणे विशेष लोक अदालतीमध्ये ठेवता येऊ शकते.लोक अदालतीमध्ये पक्षकार प्रत्यक्ष किंवा आभासी पद्धतीने सहभाग घेवू शकतात. - विशेष लोक अदालतीचे फायदे :-
साध्या व सोप्या पद्धतीने वाद मिटवता येतो.झालेल्या तडजोडीचा निवाडा अंतिम व अंमलबजावणी होऊ शकणार असते.वेळेची व पैशाची बचत होते.तडजोड झाल्यास न्यायालयीन शुल्क परत मिळते. जिल्हयातील प्रकरणे सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष लोक अदालती ठेवण्यासाठी संबंधित वकिलांना कल्पना द्यावी किंवा अधिक माहिती हवी असल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,उस्मानाबाद किंवा संबंधित तालुका विधी सेवा समितीकडे संपर्क साधावा.असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी केले आहे.
More Stories
धाराशिव प्रशालेत क्रांती दिन उत्साहात साजरा
सोनवणे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी