कळंब – श्री संत ज्ञानेश्वर बालकाश्रम कळंब येथे गेली वर्षभर राहत आश्रमातील संस्कार,मार्गदर्शन व सहकार्य यामुळे इयत्ता दहावी शालांत प्रमाणपत्र परीक्षेत 85 .60 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण होता आले या पुढील शिक्षण विज्ञान शाखेत येणार असून स्पर्धा परीक्षेची तयारी करून अधिकारी बनायचे आहे असे विचार संत ज्ञानेश्वर बालकाश्रमातील विद्यार्थिनी पूजा रामहरी चव्हाण यांनी सत्काराला उत्तर देत असताना व्यक्त केले. पूजाने संत ज्ञानेश्वर बालक आश्रम येथे राहून दहावीची परीक्षा दिली. तिने प्रतिकूल परिस्थितीमध्ये मिळवलेल्या यशाचे कौतुक करण्यासाठी कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने संत ज्ञानेश्वर बालक आश्रम येथे सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सतीश टोणगे हे होते.फेटा,शाल,पुष्पहार व वृक्षरोप घेऊन पूजाचा सत्कार करण्यात आला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आश्रम परिसरातील वृक्षाचे पूजन करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला व ज्ञानदा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष बंडू आबा ताटे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संत ज्ञानेश्वर बालकाश्रमाचे संस्थाचालक ह. भ.प.महादेव महाराज अडसूळ, सरस्वती आडसूळ,पत्रकार संभाजी गिड्डे ,सतीश तवले, संदीप कोकाटे,भारतीय जनता युवा मोर्चाचे संताजी वीर ,सहशिक्षक रमेश शिंदे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव महाराज अडसूळ यांनी तर सूत्रसंचलन माधवसिंग राजपूत यांनी केले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात