August 9, 2025

आय एम ए तर्फे खेळाडू साठी फर्स्ट एड बॉक्स भेट

  • कळंब – इंडियन मेडिकल असोसिएशन कळंब शाखे तर्फे खेळाडू साठी फर्स्ट एड बॉक्स भेट देण्यात आला.
    येथील तालुका क्रीडा संकुलाच्या क्रीडांगणावर दररोज विविध क्रीडा प्रकार खेळले जातात. खेळा दरम्यान खेळाडूंना दुखापत होण्याची शक्यता असते. अशा वेळी फर्स्ट एड बॉक्स मधील औषधांचा प्रथमोपचारा साठी उपयोग होतो. ही बाब लक्षात घेऊन आय एम ए तर्फे शाखाध्यक्षा डॉ.शितल कुंकूलोळ, सचिव डॉ.सत्यप्रेम वारे, डॉ. वर्षा कस्तुरकर, डॉ. रामकृष्ण लोंढे यांच्या उपस्थितीत क्रिडा प्रशिक्षक अंजू खान यांना मान्यवरांच्या हस्ते फर्स्ट एड बॉक्स भेट देण्यत आला.
    यावेळी डॉ.रामकृष्ण लोंढे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना म्हटले की प्रत्येक विद्यार्थ्यांने एक तरी मैदानी खेळ दररोज किमान दोन तास खेळला पाहिजे. ग्राऊंड वरिल मोकळी हवा आरोग्यासाठी खूप लाभदायक ठरते. खेळामुळे मानसिक ताण तणाव कमी होण्यास मदत होते. खाल्लेले अन्न पचण्यास मदत होते, भूक वाढते. शरीर तंदुरुस्त राहते. खेळामुळे मुलांमध्ये संघ भावना वृद्धिंगत होते. एकमेकांना मदत करण्याची वृत्ती वाढीस लागते. शेवटी क्रिडा प्रशिक्षक अंजू खान यांनी आभार मानले. यावेळी खेळाडू, क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!