कळंब – समर्थ करिअर अकॅडमी कळंब येथे संस्कृत या विषयांमध्ये उत्तम गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बालाजी (बप्पा) अडसूळ हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सोमनाथ गंभीरे, आशा राऊत, अँड. दत्ता गोंड आदी उपस्थित होते.
कळंब शहरामध्ये संस्कृत या विषयांमध्ये बळीराम कवडे यांनी संस्कृत या विषयाची उत्तम तयारी करून घेतली. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले. उत्तम गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा पालकासह सत्कार करण्यात आला. उत्तम गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये झोंबाडे प्रेरणा 100 पैकी 100 घेऊन राज्यामध्ये अव्वल स्थान पटकावले. त्याचबरोबर कु. प्राजक्ता काळे 99,कु.टेकाळे आर्या 99 , अडसूळ आर्यन 98,शिंदे श्रेयस 98,जावळे साक्षी 98 ,माने विवेक 97,वरपे संध्या 97 ,तांबारे सार्थक 96 , गौंड सुखदा 96,तरटे रोहितकुमार 95, वनवे निकिता 94,बनसोडे हर्ष 93,गंभीरे तन्मय 91,इ.असे अनेक विद्यार्थ्यांनी उत्तम गुण घेतले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष बालाजी (बप्पा) अडसूळ यांनी भारतीय संस्कृती जगामध्ये नंबर एकची संस्कृती आहे. त्यामुळे संस्कृत हा विषय केवळ गुण अधिक मिळतात या दृष्टीने न पाहता आपली संस्कृती उत्तमरीत्या जपली जावी या दृष्टीने संस्कृत विषयाकडे पाहावे. संस्कृत श्लोकांमध्ये संस्कृतीचे दर्शन असते म्हणून ते श्लोक पाठ करून आयुष्यभर आचरणात आणावेत. असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये केले. याप्रसंगी प्राध्यापक सोमनाथ गंभीरे यांनी स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धेला कसे सामोरे जावे याबद्दल मार्गदर्शन केले. आशा राऊत यांनी विद्यार्थ्यांनो आत्ता मेहनत घेतली तशीच पुढे घेतली तर येणारा भविष्यकाळ तुमच्यासाठी उज्वल असेल असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश शिंदे सरांनी केले. तर सर्वांचे आभार सिद्धी चोंदे हिने मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रुद्राली लोखंडे, इळेकर अनुजा, चोंदे शिवम , अडसूळ श्रावणी, प्रणव पवार इत्यादींनी मेहनत घेतली.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन