कळंब – कुठलेही यश हे सहजासहजी मिळत नाही,त्यासाठी खूप मोठे कष्ट करावे लागतात हे यश असेच टिकवण्यासाठी विद्यार्थ्यांनी दहावी बारावीनंतर उपलब्ध असणाऱ्या अनेक शाखांपैकी योग्य शाखेची निवड करून जिद्दीने व प्रामाणिकपणे त्या क्षेत्रांत झोकून देवून अभ्यास करूनच त्यामध्ये यश संपादन करावे. असे प्रतिपादन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांनी प्रतिपादन केले. ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन दि.१ जून २०२४ रोजी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर हे होते तर शालेय समिती सदस्य गौतम मडके व संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश (भाऊ) मोहेकर तसेच उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा.सुनिल साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना डॉ. मोहेकर म्हणाले, याप्रसंगी दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसोबतच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचेही अभिनंदन त्यांनी केले. शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक तथा प्राचार्य संजय जगताप यांनी केले. त्यानंतर दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला यामध्ये बारावी विज्ञान विभागातून आडे पूनम युवराज (प्रथम), फड विठ्ठल महादेव(द्वितीय), मते ऋतुजा किरण (तृतीय), पाटील प्राची प्रमोद, मडके पूनम नवनाथ, वाघमारे वैभवी संतोष तर संयुक्त विभागातून वाणिज्य शाखेच्या गाढवे ऋतुजा रमेश (प्रथम), शेळके सायली श्रीमंत(द्वितीय), सांगळे दिपाली दिलीप(तृतीय) कला शाखेतून शेळके आकांक्षा अनिल (प्रथम), जाधव पूनम आबासाहेब (द्वितीय) व नागरगोजे उत्तम मल्हारी (तृतीय) यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर दहावीच्या परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल पाटील सृष्टी प्रमोद (प्रथम),मडके श्रावणी ज्ञानेश्वर(द्वितीय), झोरी अतुल अंगद(तृतीय) तसेच पठाण नर्गिस उस्मान, चेडे प्रतिक्षा भारत, सुडके वैळावी परमेश्वर ,इंगळे श्रुती संजय, जगताप सोनाली संतोष,कसबे समिक्षा दयानंद, मडके स्नेहा सुमंत,महाजन प्राजक्ता पवन,कोकाटे मेघा देविदास, बोराडे अंकिता प्रकाश,कसबे स्मिता नारायण, मडके विशाल नवनाथ, वीर धनश्री माणिक, गावडे ऋतुजा दत्तात्रय, काळे बालाजी सुभाष, मडके श्रेयश संजय, जाधव प्रियंका विकास, मडके श्रेयश संजय, मडके अर्जित अरुण, कसबे आशा विजय या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शेखर गिरी यांनी केले तर आभार प्रदर्शन सहशिक्षक सतीश मडके यांनी केले. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांसह प्रा. नवनाथ करंजकर, सहशिक्षक संजय आडणे, संजय मडके, धनंजय मडके, शैलेश गुरव, कमलाकर शेवाळे,जनार्दन भामरे, चिलवंत, प्रा. राहुल भिसे, प्रा.विठ्ठल जाधव, प्रा.अमित जाधव, प्रा.रोहित मोहेकर, प्रा.श्रीमती प्रतिभा सावंत, एस. बी. सोलनकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानोबा टोपे,विष्णू जाधव,प्रथमेश साडेकर आदींनी परिश्रम घेतले.
More Stories
श्री गुलाब महाराज दिंडीचे हरी नामाच्या गजरामध्ये स्वागत
कळंबमध्ये विकसित भारत संकल्प मेळावा संपन्न
विद्याभवन हायस्कूल कळंब येथे जागतिक ऑलिंपिक डे साजरा