कळंब – विश्वाला शांततेचा संदेश देणारे महाकारूणिक भगवान तथागत गौतम बुद्ध यांच्या २५६८ व्या जयंतीनिमित्त दि.२३ मे २०२४ रोजी कळंब शहरातील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे स्मारक समितीच्या वतीने तथागत गौतम बुद्ध मूर्ती व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुभाष घोडके यांच्या हस्ते करून सामुदायिकरित्या त्रिशरण पंचशील घेण्यात आले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे सी.आर.घाडगे,राजाराम वाघमारे,मारुती गायकवाड,भास्कर सोनवणे,निवृत्ती हौसलमल,उत्तम कांबळे,स्मारक समितीचे विश्वस्त माजी नगरसेवक डॉ.सुनील गायकवाड,शिवाजी सिरसट,राजाभाऊ गायकवाड,प्रमोद ताटे,शंकर वाघमारे,रमेश बोर्डेकर,रसूल खान,भाऊसाहेब कुचेकर,किशोर वाघमारे,उत्तम सावंत,माणिक गायकवाड,सचिन तिरकर,महावीर गायकवाड,मधुकर शिलवंत,शहाजी सिरसट,सुनिल तवले,प्रा.अविनाश घोडके,प्रशांत धावारे,भैय्या जानराव आदींची उपस्थिती होती.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले