कळंब – ज्ञानेश्वर बालकाश्रम तांदूळवाडी रोड कळंब येथे आश्रमाचे संचालक ह.भ.प महादेव महाराज अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली दि 22 मे रोजी आयोजित इयत्ता बारावी माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांन्त प्रमाणपत्र परीक्षेत विज्ञान शाखेतून 83% गुण घेऊन उत्तीर्ण झाल्याबद्दल ज्ञान प्रसार विद्यालय मोहा ची विद्यार्थिनी अमरजा संभाजी गिड्डे व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी दीक्षा दत्तात्रेय अडसूळ 80 टक्के गुण घेऊन यश संपादन केले आहे. याबद्दल त्यांचा सत्कार संत ज्ञानेश्वर बालक आश्रमाचे संचालक ह.भ.प महादेव महाराज अडसूळ कार्यक्रमाचे अध्यक्ष व आश्रम संचालिका सरस्वती अडसूळ यांच्या हस्ते फेटा ,पुष्पहार व श्रीफळ देऊन करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश टेकाळे, शिक्षक संघटनेचे अशोक शिंपले ,सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गिड्डे ,सहशिक्षक बापू भंडारे,पालक संभाजी गिड्डे, श्रीधर अडसूळ यांची उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थिनींचे कौतुक व अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माधवसिंग राजपूत यांनी तर आभार बंडूआबा ताटे यांनी मानले.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन