कळंब – जगाला शांततेचा संदेश देणारे महाकारूणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या २५६८ व्या जयंतीनिमित्त दि.२३ मे २०२४ रोजी कळंब शहरातील व तालुक्यातील सर्व बौद्ध उपासक व उपसिकांच्या वतीने विशाल बुद्ध रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी ही विशाल बुद्ध रॅली इंदिरा नगर मधून निघणार असून पुढे रॅली ही इंदिरा नगर ते जुने पोलीस स्टेशन-बागवान चौक-सोनार गल्ली-विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक-छत्रपती शिवाजी महाराज चौक-पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौक ते गार्डनमधील पुतळा परिसर येथे विसर्जित होणार आहे. यावेळी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे तथागत बुद्ध मूर्ती व पूर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करून सामुदायिकरित्या त्रिशरण पंचशील व पूजापाठ करून समारोप करण्यात येणार आहे. या विशाल रॅलीस शहरातील व तालुक्यातील सर्व बौद्ध उपासक- उपसिका,बालक-बालिका यांनी या रॅलीत सहभागी होवून शोभा वाढवावी असे संयोजकांनी केले आहे.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड