मोहा – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मोहा येथिल ज्ञान प्रसार विद्यालयातील बारावीच्या परिक्षेत विज्ञान विभागाचा निकाल 100 टक्के लागला असून संयुक्त विभागातून 90 % विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. यामध्ये विज्ञान शाखेतून प्रथम कु. आडे पूनम युवराज (80.83%) द्वितीय फड विठ्ठल महादेव (76.17%), तर तृतीय मते ऋतुजा किरण (72.50%) गूण घेऊन यशस्वी झाले आहेत. कला शाखेतून प्रथम शेळके आकांक्षा अनिल (72.67%), द्वितीय कु. जाधव पूनम आबासाहेब (72%) तर तृतीय नागरगोजे उत्तम मल्हारी (67.33%) यांनी यश संपादन केले आहे. वाणिज्य विभागातून प्रथम कु. गाढवे ऋतुजा रमेश (82.17%), द्वितीय कु. शेळके सायली श्रीमंत (65.50%) तर तृतीय कु.सांगळे दिपाली दिलीप (63%) हे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.या विद्यालयातून 3 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून 43 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तर 80 विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. या यशाबद्दल संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर, मुख्याध्यापक तथा प्राचार्य संजय जगताप,संस्थेचे ज्येष्ठ संचालक तात्यासाहेब पाटील, प्रशासकीय अधिकारी रमेशभाऊ मोहेकर, पर्यवेक्षक संभाजी गिड्डे, उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा.सुनील साबळे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर