धाराशिव – अवघ्या सहा महिन्यात इलेक्ट्रॉनिक दुचाकी वाहन बंद पडल्यानंतर कंपनीकडून दुरुस्तीस टाळाटाळ केली जात असल्याने संतप्त ग्राहकांनी कंपनीच्या शोरूमला सोमवारी (दि.13) टाळे ठोकून निषेध केला. वाहनाची दुरुस्ती करुन दिल्याशिवाय टाळे काढणार नसल्याचा इशाराही ग्राहकांनी दिला आहे.
धाराशिव येथील वैभव विश्वनाथ पाटील व गणेश विकास लावंड यांनी ओला कंपनीची इलेक्ट्रॉनिक दुचाकी खरेदी केली होती. अवघ्या सहा महिन्यानंतर वाहनामध्ये सतत बिघाड होत असल्याने वाहन दुरुस्तीसाठी पाटील व लावंड यांनी कंपनीच्या शोरुममधील संबंधितांकडे तक्रार केली. परंतु संबंधितांकडून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर संतापलेल्या ग्राहकांनी कंपनीच्या धाराशिव येथील शोरुमला टाळे ठोकून निषेध व्यक्त केला. वाहनामधील बिघाड दुरुस्त केल्याशिवाय टाळे काढू देणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी