August 9, 2025

दिनेश सातपुते यांचा सत्कार

  • कळंब – दिनेश परशुराम सातपुते कळंब यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासुटिकल एज्युकेशन अँड रिसर्च अहमदाबाद या विद्यापीठाने मेडिसिनल केमिस्ट्री या विषयात पीएचडी ही पदवी प्रदान केली आहे.
    याबद्दल दिनेश सातपुते यांचा व त्यांचे वडील परशुराम सातपुते,आई सरला सातपुते यांचा बुके देऊन व पेढे भरून मित्र परिवाराच्यावतीने डॉ. रमाकांत कल्याणकर,डॉ.अमोल कल्याणकर,मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टेकाळे,सेवानिवृत्त बँक मॅनेजर महारुद्र हुंडेकरी,रमेश खोसे,माधवसिंग राजपूत,गणेश सातपुते यांनी सत्कार केला. दिनेश सातपुते यांनी अँन्टी कॅन्सर ड्रग तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या केमिकलवर संशोधन करून शोध प्रबंध सादर केला आहे. त्यांचे माध्यमिक शिक्षण कळंब येथे झाले आहे. पुढील पदवीपर्यंत शिक्षण नाशिक मध्ये तर पदवीत्तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासुटिकल एज्युकेशन अँड रिसर्च हैदराबाद येथे पूर्ण केले आहे .त्यांनी हा शोध प्रबंध डॉ.दिनेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला आहे.
error: Content is protected !!