August 9, 2025

रास्त भाव दुकानासाठी नवीन पॉज मशीन कधी मिळणार?

  • कळंब ( माधवसिंग राजपूत ) – अंगठा लागत नाही पावती निघत नाही मशीन बंद पडते अशा अनेक तक्रारी व यामुळे त्रस्त रास्त भाव दुकानदार व लाभार्थी या भंगार व डबड्या मशीन कधी बदलणार व ही कटकट लवकर संपवावी यासाठी तक्रारी करीत होते जिल्हा पुरवठा विभागाकडून या जुन्या दहा वर्षांपूर्वीच्या मशीन बदलून नवीन मशीन देण्याचा निर्णय घेतला आहे.
    या जुन्या मशीन रास्त भाव दुकानात 2014 मध्ये देण्यात आल्या होत्या त्याचा वापर आज मे 2024 पर्यंत होत असून या मशीन भंगार झाल्या असून सतत त्या बंद पडत होत्या यामुळे धान्य वितरण करीत असताना अडथळा निर्माण होत असे व वेळ वाया जात होता नवीन मशीन कार्यालयाला उपलब्ध झाल्या आहेत परंतु मशीन वाटपाचे मुहूर्त मात्र लांबत आहे या मशीनचे वाटप लवकरच करण्यात येत आहे असा वारंवार संदेश कळंब तालुका तहसील कार्यालय पुरवठा विभागाकडून रास्ता भाव दुकानदारास पाठवले जात असून जुन्या मशीन सोबत दिलेली स्पेअर आंटिना , QR
    कोड स्कॅनर ,चार्जर, मशीन या सर्व वस्तू नविन मशीन वाटप करतेवेळी जमा कराव्यात त्यासाठी सर्वांनी वरील वस्तू एकत्रित करून ठेवावे मशीन वाटपाचा संदेश दिला जाईल त्यावेळी वरील वस्तू घेऊन याव्यात असे संदेश रास्तभाव दुकानदारास पाठवले जात आहे परंतु या नवीन मशीन कधी मिळणार त्याचे मुहूर्त कधी निघणार असा प्रश्न लाभार्थी विचारत आहेत.
    जिल्हा पुरवठा विभागाकडून प्रति महिन्याच्या 23 तारखेला संबंधित रास्त भाव दुकानदारास तालुका पुरवठा गोडाऊन मधून अंत्योदय , प्राधान्य कुटुंब लाभार्थीनां या शिरापत्रिकेवर तांदूळ, गहू व उपलब्ध मोफत धान्य वाटप केले जाते परंतु याविषयीचा डाटा जिल्हा पुरवठा विभागाकडून प्रति महिन्याच्या 5 ते 6 तारखेपर्यंत टाकला जातो दिनांक 7 तारखेला प्रत्यक्ष धान्य वाटप सुरू होते.
    धाराशिव लोकसभा मतदारसंघातील मतदान सात मेला पार पडले मे महिन्याचा डाटा 10 तारखेस उपलब्ध झाला आहे परंतु मशीन मात्र उपलब्ध झाल्या नाहीत नविन मशीन नळदुर्ग ,उमरगा येथे उपलब्ध झाल्या आहेत, तुळजापूर ,धाराशिव ,कळंब ,भूम, परंडा ,वाशी या तालुक्यासाठी या नवीन मशीनचे वाटप अद्याप झालेले नाही या मशीन लवकर उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी लाभार्थ्याकडून होत आहे.
  • @सॉफ्टवेअर सुविधा युक्त असेल नवीन मशीन –
  • नवीन मशीन याद्यावत असून यात सॉफ्टवेअर सुविधा आहे जुन्या मशीन मध्ये 85 वर्षांपुढील लाभार्थ्याचा अंगठा लागत नसे परंतु या नवीन मशीन मध्ये आय हे बटन दाबल्यास डोळ्याच्या माध्यमातून संबंधित लाभार्थ्याची ओळख पटेल यामुळे सतत निर्माण होणारी अडचण दूर होण्यास मदत होणार आहे.
error: Content is protected !!