धाराशिव (माध्यम कक्ष) – 7 मे रोजी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.भारत निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात मोबाईलचा वापर करण्यास निर्बंध घातले आहे. जिल्हादंडाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी काढलेला एका आदेशाद्वारे 40 – उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सर्वच 2139 मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात मोबाईल वापरण्यास प्रतिबंध केला आहे.निवडणूक प्रक्रियेशी संबंधित निवडणूक निरीक्षक,निवडणूक निर्णय अधिकारी,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी,अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी,सूक्ष्म निरीक्षक व मतदान केंद्राध्यक्ष यांना मोबाईल वापरण्यास मुभा दिली आहे.सर्वच मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात मोबाईल वापरण्यात प्रतिबंधच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी.असे या आदेशात नमूद केले आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी