कळंब – गेली दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व देश प्रगती करीत असून जगातील पाच नंबरची अर्थव्यवस्था असलेला देश म्हणून पुढे येत आहे. याचा आपणास अभिमान वाटायला हवा यासाठी नरेंद्र मोदी यांना खंबीर साथ देण्यासाठी व जिल्ह्याच्या विकासासाठी महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांना विजयी करावी असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी धाराशिव मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई राणा जगजीतसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ होळकर चौक कळंब येथील प्रचार सभेत ४ मे रोजी बोलत असताना केले. मुंडे यांनी आपल्या भाषणात गेल्या पाच वर्षात आपल्या मतदारसंघातील खासदाराने कोणती विकासाची कामे केली ? कोणते उद्योग जिल्ह्यात आणले ,पंधरा हजार सुशिक्षित बेरोजगार तरुणाना रोजगार दिले का ? असा प्रश्न विचारला मोदी सरकारने आयुष्यमान भारत योजना, गॅस कनेक्शन ,लखपती दीदी योजना तसेच कोव्हीड काळात व्हॅक्सीन उपलब्ध करून एकदा नव्हे दोनदा लस देऊन जीवनदान दिले आहे , केंद्र सरकार शेतकऱ्यासाठी किसान सन्मान योजनेतून वर्षाला सहा हजार देत आहे आता यात राज्य सरकार देखील सहा हजार रुपये प्रति वर्ष देणार असून यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर बारा हजार रुपये मिळणार आहेत तर सोयाबीन साठी आचारसंहिता संपल्यानंतर प्रति हेक्टरी पाच हजार रुपये, दोन हेक्टर पर्यंत साडेचार हजार कोटीचे पॅकेज देण्याविषयी सरकारने निर्णय झाला असून कापूस या पिकाविषयी निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले ३० एप्रिल ला धाराशिव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचंड जाहीर सभा झाली या सभेने अर्चनाताई पाटील यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे देशाच्या विकासासाठी मोदींना साथ देण्यासाठी अर्चनाताई पाटील यांना आपण निवडून द्यावे असे आवाहन केले याप्रसंगी आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी आपल्या भाषणात गेली १९ वर्ष माझे व दहा वर्ष उमेदवार अर्चना पाटील यांचे काम पाहत आहात शेतकऱ्यांसाठी न्यायालयीन संघर्ष करू पिक विमा मिळवून दिला कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेतून मराठवाड्याच्या वाट्यातील 23.66% पाण्यापैकी हक्काचे 7% पाणी पुढील वर्षापासून आपल्याला जिल्ह्याला मिळणार असल्याचे सांगितले तसेच कोल्हापूर, सांगली येथील अतिरिक्त पाणी बंद बोगद्यातून जिल्ह्याला उपलब्ध होणार आहे तसेच एमआयडीसीच्या माध्यमातून रोजगार व आई तुळजाभवानी मंदिराचा कायापालट करणार असून वैश्विक दर्जाचे पर्यटन स्थळ बनणार आहे राज्य सरकारच्या मान्यते बरोबर केंद्र सरकारची मदत घ्यावी लागणार आहे यामुळे जिल्ह्याच्या कायापालट होणार आहे असे सांगितले याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे ,तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, शिवसेना शिंदे पक्षाचे संजय मुंदडा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवीण यादव यांनी अर्चनाताई पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले.मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश पाटील, शिवसेनेचे अनिल खोचरे ,सागर मुंडे ,बिपिन हौसलमल,आशा भवर, सरला खोसे ,अॕड, शकुंतला फाटक ,दत्ता तनपुरे , बंडू बनसोडे महायुतीच्या कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती .
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात