August 9, 2025

शिवप्रताप कापसे चे ऑलम्पिक इंटरनॅशनल परीक्षेमध्ये यश

  • कळंब (महेश फाटक ) – द ग्रीन फिंगर स्कूल अकलूज या शाळेतील विद्यार्थी कळंब येथील बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे यांचे चिरंजीव शिवप्रताप शिवाजी कापसे याची ऑलिम्पिक इंटरनॅशनल परीक्षेमध्ये, इंटरनॅशनल रँक मध्ये बाविसावा, रिजनल रँक मध्ये विसावा तर शाळेत पहिला नंबर मिळाला. या यशा बद्धल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिवप्रताप शिवाजी कापसे च्या परीक्षेतील यशा बद्दल कळंब येथे शिवाजी कापसे मित्र मंडळ व शहरातील मित्रपरिवार, विविध संघटनेच्या वतीने सत्कार करून त्याला शुभेच्छा देण्यात आल्या.
error: Content is protected !!