August 9, 2025

अंगणवाडी शिक्षिका सुलावती रणदिवे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

कळंब (राजेंद्र बारगुले ) – तालुक्यातील ईटकुर येथील अंगणवाडी क्रमांक ४०२ मधील अंगणवाडी सेविका सुलावती परमेश्वर रणदिवे यांचा सेवा निवृत्ती निमित्त साठे नगर मधील सखल समाज बांधवाकडून त्यांच्या सेवा निवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला. १९९० मध्ये ईटकुर येथील अंगणवाडी क्रमांक ४०२ मध्ये मदतनीस या पदावर नियुक्ती झाली होती. तेव्हापासून त्यांची निरंतर प्रामाणिकपणे सेवा करून त्यांना १९९४ मध्ये कार्यकर्ति या पदावर पदोन्नती होऊन अंगणवाडी शिक्षिका म्हणून ३४ वर्ष सेवा बजावली. त्यांची सेवा ३० एप्रिल रोजी पूर्ण झाली त्यांनी अनेक बालकांचे संगोपन त्यांच्या कार्यकाळात पूर्ण केले या सेवेमध्ये त्यांना आदर्श अंगणवाडी शिक्षिका म्हणून दोन वेळेस गौरवण्यात आले. याबद्दल त्यांचा ईटकुर मधील माता पालकांच्या वतीने येतोचित सन्मान करून त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी साठे नगर मधील वार्ड क्रमांक ५ चे ग्रामपंचायत सदस्य विनोद चव्हाण व त्यांच्या पत्नी सविता चव्हाण तसेच साठे नगर मधील माता पालक यांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!