August 9, 2025

6 मे रोजी मतदान केंद्रावर पोहचतील मतदान पथके

  • धाराशिव ( माध्यम कक्ष) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने येत्या 7 मे रोजी 40 – उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजतापर्यंत मतदान होणार आहे.निवडणुकीच्या अनुषंगाने 6 मे रोजी मतदान पथकातील 4 कर्मचारी,1 चतुर्थ श्रेणी कर्मचारी व 1 पोलीस कर्मचारी असे एकुण 6 कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. तर 7 मे रोजी मतदानाच्या दिवशी वरील 6 कर्मचाऱ्यांशिवाय ग्रामस्तरिय अधिकारी,आशा कार्यकर्ती किंवा अंगणवाडी सेविका उपस्थित राहणार आहे.
  • मतदान पथकास स्वच्छ पिण्याचे पाणी,चहा,रात्रीचे जेवण,मच्छर अगरबत्तीची व्यवस्था 6 मे रोजी तर 7 मे रोजी मतदान पथकातील कर्मचाऱ्यांसाठी आवश्यकतेनुसार अंघोळीसाठी गरम पाणी,चहा-नाष्टा व दुपारी भोजन तसेच सायंकाळी चहा व्यवस्था करण्यात येणार आहे.
error: Content is protected !!