कळंब (परमेश्वर खडबडे ) – संविधान शाबूत ठेवण्यासाठी लोकशाही संस्थांची मोडतोड करून होत असलेला दुरूपयोग थांबविण्यासाठी भ्रष्टाचारास राजमान्यता देणारा भाजपाचा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडण्यासाठी. प्रत्येक हाताला रोजगार देवून,महागाईला पायबंद घालण्यासाठी शेतकऱ्यांचे शेतीमालास कायदेशीर संरक्षण देण्यासाठी भूमिहीनांनी जगण्यासाठी सरकारी जमीनीवर ( गायरान – जंगल जमिनीवर..) केलेली अतिक्रमणं नियमित करण्यासाठी.प्रत्येकाच्या हाताला काम – कामाचा न्यायपूर्ण दाम व सामाजिक सुरक्षा देण्यासाठी, दलित – आदिवासी – भटके, महिला व अल्पसंख्यांककांना सर्व प्रकारची सुरक्षा देण्यासाठी,जात – धर्माचे बखेडे थांबवून,समाजात सलोखा निर्माण करण्यासाठी,पुन्हा कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी धाराशिव-४० महाविकास आघाडी व शिवसेना ( उबाठा) चे उमेदवार खा.ओमराजे निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी भारत जोडो अभियान आयोजित संविधान बचाव – देश बचाव परिषदेचे आयोजन आज दि.२ मे २०२४ रोजी वार गुरूवारी दुपारी ३ वाजता तालुक्यातील हासेगाव (के) येथील पर्याय संस्थेच्या हॉलमध्ये भारत जोडो अभियानाचे मराठवाडा समन्वयक साथी सुभाष लोमटे,साथी विश्वनाथ तोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी संविधानवादी-लोकशाही-सलोखा व शांतता प्रेमींनी या परिषदेस आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन भारत जोडो धाराशिव जिल्हा समन्वयक साथी सुभाष घोडके व साथी सुरेश शेळके यांनी केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात