August 9, 2025

निवडणूकीची कामे जबाबदारीने व पारदर्शकतेने पार पाडावीत – निवडणूक निरीक्षक प्रमोदकुमार उपाध्याय

  • निवडणूकविषयक तयारीचा आढावा
  • धाराशिव(जिमाका) – निवडणूक विषयक कामे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पारदर्शकपणे आणि जबाबदारीने पार पाडवीत.असे निर्देश निवडणूक निरीक्षक (सामान्य) प्रमोदकुमार उपाध्याय यांनी दिले.
    दि.१९ एप्रिल २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व यंत्रणांचे नोडल अधिकारी यांच्या निवडणूकविषयक आढावा बैठकीत ते बोलत होते.सभेला जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओंबासे,निवडणूक निरीक्षक (खर्च) प्रदीप डुंगडुंग,निवडणूक निरीक्षक (पोलीस) जयस्वाल,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष,पोलीस अधीक्षक अतुल कुळकर्णी,सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व सर्व नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते.
    उपाध्याय पुढे म्हणाले, निवडणूकविषयक प्रशिक्षण अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रकारे देण्यात यावे. त्यामुळे संबंधितांना काम करण्यास कुठल्याही अडचणी येणार नाही.समाज माध्यमातून उमेदवारांच्या आक्षेपार्ह पोस्ट होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. तसेच मतदारांच्या व राजकीय पक्षांच्या अडीअडचणी समजून घ्याव्यात असे ते यावेळी म्हणाले.
    जिल्हाधिकारी डॉ.ओंबासे यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने विविध प्रकारचे प्रशिक्षण घेण्यात आल्याचे सांगून दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी आशा सेविकांच्यामार्फत प्रोत्साहीत करण्यात येत आहे.मतदार जागृती कार्यक्रमातून विविध उपक्रम राबवले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
    अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जाधव यांनी निवडणूकविषयक, धार्मिक,पुरातन, मागील लोकसभा निवडणुकीत झालेले मतदान,मतदान केंद्राची माहिती,संवेदनशील मतदान केंद्र,निवडणुकीसाठी लागणारा अधिकारी व कर्मचारी वर्ग, आंतरराज्य तपासणी नाके, आचारसंहिता कक्ष याबाबतची माहिती तसेच कायदा व सुव्यवस्था, प्रतिबंधात्मक कारवाई याबाबतची माहिती सादरीकरणातून दिली.
    उपाध्याय यांनी दि.19 रोजी मौजे खानापूर, ता. धाराशिव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मतदान केंद्र क्रमांक 385 ला भेट देऊन पाहणी केली.त्यांनतर त्यांनी धाराशिव शहरातील शासकीय तंत्रनिकेतन,तुळजापूर रोड येथील स्ट्रॅागरुमला भेट देऊन पाहणी केली. तसेच जिल्हा निवडणूक कार्यालय, धाराशिव येथे भेट देऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबतच्या प्रक्रियेची पाहणी करुन उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांना सूचना दिल्या.
error: Content is protected !!