March 26, 2026

आबेद बागवानच्या प्रामाणिकतेचे कौतुक – विश्वनाथ तोडकर

  • कळंब – आबेद बागवान या नवतरुणाने पैशाची लालसा न दाखवता चुकून आपल्या खात्यावर जमा झालेले पन्नास हजार रुपये उचलून त्या व्यक्तीस परत केले आहेत.
    आबेदच्या प्रामाणिकपणाचे अनिक फायनान्स कडून खूप मोठा सत्कार केला जाईल असे सांगून आजच्या स्वार्थी युगात प्रामाणिकतेचा आदर्श पायंडा घालून दिला असल्याचे सांगितले.
    आबेद बागवान यांच्या खात्यावर बोरवंटी येथील शेतकरी शिवाजी मारुती इंगळे यांचे पन्नास हजार रुपये चुकून जमा झाले होते. आजच्या परिस्थितीत पन्नास हजार रुपये दुसऱ्याच्या कष्टाचे मला नको म्हणणारा आबेद बागवान या तरुणाच्या प्रामाणिकतेचे कौतुक करून त्याच्या पाठीवर शाब्बासकीची थाप म्हणून प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थे मार्फत साक्षी कोचिंग क्लासेसवर आबेद बागवान याचा भारत जोडो अभियानाचे मराठवाडा समन्वयक विश्वनाथ तोडकर यांच्या हस्ते पुष्पहार,वर्तमानपत्र व साक्षी कादंबरी देऊन सत्कार करण्यात आला.
    याप्रसंगी प्रबुद्ध रंगभूमीचे अध्यक्ष तथा भारत जोडा अभियानाचे धाराशिव जिल्हा समन्वयक सुभाष घोडके,पत्रकार परमेश्वर खडबडे,प्रा.अविनाश घोडके आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!