August 9, 2025

खात्यावर आलेले ५० हजार रुपये आबेद बागवानने केले परत

  • आबेद यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक
  • कळंब – येथील टायगर ग्रुपचे आबेदभाई बागवान यांनी त्यांच्या बँक खात्यावर बोरवंटी येथील शेतकरी शिवाजी मारुती इंगळे यांचे ५० हजार रूपये परत केले. आबेद बागवान यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.
    बोरवंटी येथील शेतकऱ्याचे ५० हजार रूपये चुकून आबेद बागवान यांच्या खात्यावर आले होते. ही व्यक्ती शेतकरी असल्यामुळे त्यांनी ती रक्कम सोहेल शेख नावाच्या व्यक्तीला मुंबईला पाठवायची होती, ती रक्कम तिकडे न जाता आबेद
    भाईच्या खात्यावर जमा झाली. जमा झालेले त्यांना माहीत पण नव्हते. त्यांना सदरील व्यक्तीने कळंबमध्ये आल्यानंतर आबेद भाईच्या दुकानात जाऊन विचारपूस केली. तेव्हां त्यांना माहीत झाले.
    खात्यावर पन्नास हजार आलेले त्यांनी लागलीच बाबू चाऊस सोबत जावून ती रक्कम सदरील व्यक्तीस दिली. आबेद भाईच्या इमानदारीमुळे त्यांना त्यांची रक्कम भेटली. यावेळी बबलू इरफान शेख होते. या प्रामाणिकपणा बद्धल आबेद भाईचे कौतुक होत आहे.
error: Content is protected !!