August 9, 2025

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

“मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई.”

धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.14 एप्रिल रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 81 कारवाया करुन 67,700 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.

“ अवैध मद्य विरोधी कारवाई .”

मा.पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली काल रविवार दि.14.04.2024 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 11 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला सुमारे 800 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव, 288 लि. गावठी दारु, 260 लि. सिंधीताडी अम्ली द्रव व देशी विदेशी दारुच्या 150 सिलबंद बाटल्या असे मद्य जप्त करण्यात आले. सदर मद्य जप्त करुन त्यांची एकत्रीत किंमत अंदाजे 1,05,060 ₹ आहे. यावरुन महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 11 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.

1)स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 6 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे- आरोपी नामे- सुनिल सुभाष कोटमवार, वय 35 वर्षे, रा. ईस्लामपुरा कळंब ता. कळंब जि. धाराशिव हे 14.30 वा. सु. आपल्या राहत्या घराच्या पत्रयाचे शेडसमोर अंदाजे 8,000 ₹ किंमतीची 80 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. आरोपी नामे- विकास विजयसिंह राठोड, वय 29 वर्षे, रा. नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 11.30 वा. सु. सरकार धाब्याच्या पाठीमागे अंदाजे 5,500 ₹ किंमतीची 55 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. आरोपी नामे- लक्ष्मण हणमंत भाटे, वय 40 वर्षे, रा. माहात्मा फुलेनगर उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे 12.00 वा. सु. आपल्या राहात्या घरासमोर मोकळ्या जागेत अंदाजे 4,300 ₹ किंमतीची 30 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. आरोपी नामे- परेगाबाई शंकर काळे, वय 57 वर्षे, रा. जुना बस डेपो पारधी पीढी ता. जि. धाराशिव हे 11.40 वा. सु. आपल्या राहात्या घराच्या पत्रयाचे शेडसमोर अंदाजे 31,200 ₹ किंमतीची 400 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव 40 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. आरोपी नामे- भारत भगवानसिंग राजपुत, वय 34 वर्षे रा. जवाहर चौक तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 16.30 वा. सु. भारत ऑटोमोबाईल जवळ मोकळ्या जागेत अंदाजे 20,800 ₹ किंमतीची 260 लि. सिंधीताडी अम्ली द्रव जप्त करण्यात आले. आरोपी नामे- संतोष महादेव देवकर, वय 40 वर्षे, रा. देवकते गल्ली धाराशिव ता. जि. धाराशिव हे 17.00 वा. सु. वैराग रोड लगत धाराशिव येथे अंदाजे 3,360 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 96 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.

2)धाराशिव शहर पो. ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. नितीन अनिल शिंदे, वय 29 वर्षे, रा. झोरे गल्ली भारत टॉकीज जवळ धाराशिव ता. जि. धाराशिव हे 07.30 वा. सु. जिजाता उद्यान कंपाउंडच्या समोर मोकळ्या जागेत धाराशिव अंदाजे 3,200 ₹ किंमतीची 40 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली

3)वाशी पो. ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे- शारदा मधु शिंदे, वय 46 वर्षे, रा. खैराटवस्ती पारधी पीडी वाशी ता. वाशी जि. धाराशिव या 08.30 वा. सु. आपल्या राहत्या घराचे पाठीमागील बाजूस अंदाजे 22,100 ₹ किंमतीची 400 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 20 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.

4)मुरुम पो. ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-आम्रत श्रीमंत पाटील, वय 51 वर्षे, रा. बेंळंब ता. उमरगा जि. धाराशिव हे 13.30 वा. सु. हॉटेल गुडलक बियर बारचे बाजूस मोकळे जागेत बेळंब येथे अंदाजे 4,840 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 46 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.

5)नळदुर्ग पो. ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे- सुधामती सुभाष सगर, वय 52 वर्षे, रा. होर्टी, ता. तुळजापूर जि. धाराशिव या 19.00 वा. सु. आपल्या राहात्या घराच्या बाजूस होर्टी येथे अंदाजे 800 ₹ किंमतीची 10 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.

6)तामलवाडी पो. ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-रोहीत उर्फ मोन्या रावसाहेब छबिले रा. काटी ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 21.10 वा. सु. हॉटेल बाळासाहेब याचे बाजूला अंदाजे 960 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 8 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.

“ जुगार विरोधी कारवाई.”

तामलवाडी पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान तामलवाडी पोलीसांनी दि.14.04.2024 रोजी 14.20 वा. सु. तामलवाडी पो.ठा हद्दीत देवकुरुळी येथे वडाचे झाडाखाली छापा टाकला. यावेळी आरोपी नामे- 1) चंद्रकांत आनंदा तुळसे, वय 65 वर्षे, 2) वसंत सोपान गायकवाड, वय 58 वर्षे, 3)सुनिल गणपत जाधव, वय 42 वर्षे, 4) शेरखान मोदीन सय्यद, वय 72 वर्षे, सर्व रा. देवकुरुळी ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 14.20 वा. सु. देवकुरुळी येथे वडाचे झाडाखाली तिरट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 820 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये तामलवाडी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

बेंबळी पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान बेंबळी पोलीसांनी दि.14.04.2024 रोजी 14.30 वा. सु. बेंबळी पो.ठा हद्दीत करजखेडा बाजारात देशी दुकानाजवळ रोडवर छापा टाकला. यावेळी आरोपी नामे- 1) भरत उर्फ भारत राम कांबळे,वय 42 वर्षे रा. करजखेडा ता. जि. धाराशिव हे 14.30 वा. सु. करजचोडा बाजारात देशी दारुच्या दुकानाजवळ रोडवर सुरट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 440 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये बेंबळी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला

“ प्राण्यांना निर्दयपणे वागणूक देणाऱ्यावर गुन्हा दाखल.”

लोहारा पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) अरबाज नसिरसाब शेख, वय 23 वर्षे, रा. रहीमनगर नळदुर्ग ता. तुळजापूर, 2) एजाज हुसेन कुरेशी रा. नळदुर्ग ता. तुळजापूर यांनी दि.14.04.2024 रोजी 12.30 ते 02.00 वा.सु. लोहारा ते पाटोदा रोडवरील मार्डी गावचे जवळ आश्रम शाळेजवळ रोडवर आयशर टेंम्पो क्र एमएच 25 बी बी 3053 वाहनामध्यं अंदाजे 05,70,000₹ किंमतीच्या 19 म्हशी वाहनासह असा एकुण 122, 70, 000₹ किंमतीच्या 19 म्हशी बांधून त्यांना पुरेसी हालचाल करता येणार नाही अशा रितीने छळ करुन त्यांची वाहतुक करताना लोहारा पो ठाणेच्या पथकास मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तींविरुध्द प्राण्यांना निर्दयपणे वागणूक कायदा कलम 11 (1) (डी)(ई)(एच) सह कलम 119 म.पो.का अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

मालमत्तेविरुध्द गुन्हे.”

धाराशिव शहर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-राणी संतोष डोंगरे, वय 50 वर्षे, रा. जुना बसडेपो एकता नगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांचे राहाते घराचा पाठीमागील दाराची कडी कोंडा अज्ञात व्यक्तीने दि. 13.04.2024 रोजी 22.00 ते दि. 14.04.2024 रोजी 03.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन देवघारातील ड्राव्हरमध्ये ठेवलेले 5 ग्रॅम वाजनचे सोन्याचे दागिने व एच एफ डिलक्स मोटरसायकल क्र एमएच 25 एक्यु 8119 असा एकुण 80,000₹ किंमतीचा मालचोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- राणी डोंगरे यांनी दि.14.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे. तसेच गुन्ह्याच्या तापासा दरम्यान फिर्यादीने दिलेल्या माहितीवरुन धाराशिव पोलीस ठाण्याच्या पथकाने आरोपी नामे- शुभम गोपाळ डोंगरे, वय 28 वर्षे, रा. ब्रम्हगाव ता. जि. धाराशिव यास ताब्यात घेवून त्याच्याकडे गुन्ह्याच्या संदर्भात चौकशी केली असत त्यांने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. गुन्ह्याच्या पुढील तपास सुरु आहे.

भुम पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-श्रीकांत हणुमंत पायघन, वय 41 वर्षे, रा. मांडेगाव ता. बार्शी जि. सोलापूर यांचे शेत मालक स्नेहल राजेंद्र मिरगणे यांचे भुम शिवारातील शेत गट नं 174 मधील विहीरचे पाणी आरोपी नामे- सुदाम प्रल्हाद कदम रा. भुम ता. भुम जि. धाराशिव यांनी त्यांचे मोटीरच्या सहाय्याने विनापरवाना स्वत:चे फायद्यासाठी दि. 08.04.2024 रोजी 10.30 ते दि. 14.04.2024 रोजी पर्यंत उपसा करुन पाण्याची चोरी केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- श्रीकांत पायघन यांनी दि.14.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

“ मारहाण.”

उमरगा पोलीस ठाणे : आरोपी नामे-खंडु कमलाकर वासुदेव व त्याचे सोबत दोन अनोळखी इसम रा. भुसणीवाडी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.13.04.2024 रोजी 18.00 वा. सु. युसुफ मकानदार यांचे दुकानासमोर मुरुळी रस्त्यालगत शेतात फिर्यादी नामे- पंकजकुमार सुरेश राठोड, वय 22 वर्षे, रा. कदेर तांडा ता. उमरगा जि. धाराशिव यांना मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,स्टिलचे पाते असलेल्या कंबरेच्या दांडपट्ट्याने छातीवर मारुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- पंकजकुमार राठोड यांनी दि.14.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे 326, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

भुम पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) सचिन शिंदे, 2) शंकर बलभिरम काळे, रा. पारधी पिडी ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.05.04.2024 रोजी 10.30 वा. सु. हॉटेल आदित्य समोर भुम येथे दि. 06.04.2024 रोजी 00.30 वा. सु. बसस्टॅड भुम समोर फिर्यादी नामे- स्वप्निल सुधीर हावळे, वय 29 वर्षे, रा. लक्ष्मीनगर भुम ता. भुम जि. धाराशिव यांची मोटरसायकल नमुद आरोपींनी आडवून तु आमचे भांडणात का पडलास या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, चाकुने मारहाण करुन गंभीर जखमी केले.व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- स्वप्निल हावळे यांनी दि.14.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे 326, 323, 341, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

कळंब पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)आयुब नसीर पठाण, 2) शोएब आयुब पठाण, 3) नसरीन आयुब पठाण, 4) शाहीद आयुब पठाण, सर्व रा. गणेश नगर डिकयळ कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 14.04.2024 रोजी 14.30 वा. सु. गणेश नगर डिकसळ कळंब येथे फिर्यादी नामे- परवीन सलीम शेख, वय 40 वर्षे, रा. गणेश नगर डिकसळ कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी बांधकामाचे कारणावरुन शिवीगाळ करुन दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- परवीन शेख यांनी दि.14.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे 324, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

“रस्ता अपघात.”

ढोकी पोलीस ठाणे : मयत नामे- फुलेश मनहेर राम उईके, वय 19 वर्षे, रा.सुरेला ता. अंतगढ जि. कांकेर राज्य छत्तीसगड हे दि.13.04.2024 रोजी 02.00 वा. सु. हनुमंत त्रिंबक शिंदे रा. वाखारवाडी ता. जि. धाराशिव यांचे शेतात श्री सेलवीनयका बोरवेलची गाडी क्र टीएन 34 व्ही 4577 हीने बोर घेण्याचे काम करत असताना आरोपी नामे- सुंदरमुर्ती एस शिवलम रा. अरुंतथिअर सिस्ट्री व्यापमपट्टी पुदुर पोस्ट विनोर ता. जि. नामाकल तामीळनाडू यांनी त्याचे ताब्यातील बोरवेलची मशिन ऑपरेट करुन यातील फुलेश उईके याची मान ऑटोमॅटीक चेंजर डुम खाली आडकुन जखमी होवून त्याचे मरणास कारणीभुत झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मनहेर सोमाराम उईके, वय 45 वर्षे, रा. सुरेली ता अंतगढ जि. कांकेर राज्य छत्तीसगड यांनी दि.14.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 304(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

error: Content is protected !!