August 9, 2025

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये कनगरा येथील युवकांचा जाहीर प्रवेश

  • धाराशिव – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे व धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय धाराशिव येथे पाडोळी गटप्रमुख पदी वैभव इंगळे यांची नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.
    कनगरा येथील युवक गोपाळ दंडगुले,हरी जाधव,बाबा चव्हाण, सचिन दंडगुले,अंगद माने, विकास धोत्रे,धोंडीबा गायकवाड, जितेंद्र माने यांनी पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला.
    यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड,माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, आदीवासी सेल जिल्हाध्यक्ष नानासाहेब पवार,धाराशिव युवक तालुकाध्यक्ष बालाजी शिंदे, अंबेजवळगा जि.प गट प्रमुख सुरेश राठोड, किसेगाव जि.प. गटप्रमुख लिंबराज लोखंडे,अंकुश माळी, बालाजी जावळे आदी पदाधिकारी,कार्यकर्ते,सहकारी उपस्थित होते.
error: Content is protected !!