वरोरा – वरोरा नजीक परसोडा येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती ब्राह्मदास मेश्राम यांचे अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख वक्ते मराठा सेवा संघ प्रणित डॉ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे राज्य उपाध्यक्ष रामचंद्र सालेकर,सामाजिक कार्यकर्ते सुधाकर चौखे,किशोर नगराळे यांचे मार्गदर्शन झाले. याप्रसंगी रामचंद्र सालेकर यांचे हस्ते पंचशील ध्वजारोहन करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली.सालेकर यांनी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे कैवारी नसून शोषित,पिढीत,शेतकरी,शेतमजूर, महिला तथा सर्व भारतीयांचे कैवारी होते.शोषित वंचित ओबीसीं महिलांसाठी त्यांनी केलेले कार्य भारतीयांपर्यंत पोहचू नये म्हणून दलितांचे कैवारी संबोधने हे एक षडयंत्र असल्याचे ते म्हणाले. ते आधुनिक भारताचे शिल्पकार असून प्रत्येक क्षेत्रातील त्यांचे कार्य अथांग सागरा प्रमाणे आहे. शैक्षणिक सामाजिक धार्मिक राजकीय आर्थिक बौद्धिक साहित्यिक पत्रकारिता ..इ.सर्व क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणार विश्वातलं एकमेव व्यक्तिमत्व विश्वाचं आठव आश्चर्य म्हणजे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर होय.असे सांगून डॉ.बाबासाहेबांचे शेती,शेतकरी,मजूर,महिला,ओबीसी,आदिवासी,सं विधान.. आदी वर आपल्या एक तासाच्या व्याख्यानात संक्षिप्त परंतु मार्मिक विवेचन रामचंद्र सालेकर यांनी केले. याप्रसंगी सुधाकर चौखे सरांनी ओवी द्वारा काव्यरूपात डॉ.बाबासाहेबांची तथा महानायीकांच्या कार्याची महती विषद केली, किशोर नगराळे यांनी समाजाच्या उत्तथांणासाठी बाबासाहेबांनी केलेल्या संघर्षावर प्रकाश टाकला.त्यानंतर अध्यक्षीय भाषण झाले. . याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक धर्मप्रकाश मानकर यांनी केले तर आभार धनराज रामटेके यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन अमित गजभिये सर यांनी पार पाडले. कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी स्वयंदीप बहुउद्देशीय बौद्ध मंडळ व रमाई महिला मंडळ तथा समस्त परसोडा वासीयांनी परिश्रम घेतले.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन