August 9, 2025

संविधान रक्षणार्थ सुभाष घोडके यांचे लिखाण कौतुकास पात्र – सी.आर.घाडगे

  • कळंब – संविधान व लोकशाहीच्या रक्षणार्थ संपादक सुभाष घोडके यांचे लिखान जनजागृतीसाठी कौतुकास पात्र असल्याचे गौरवोदगार सेवानिवृत्त मुख्याध्यापक सी.आर.घाडगे यांनी महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेषांक प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षीय समारोपाच्या भाषणातून काढले.
    सा.साक्षी पावन ज्योत या वर्तमानपत्राच्या महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेषांकाचा प्रकाशन सोहळा दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी दुपारी १२.३० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून महाराष्ट्र लोकविकास मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ तोडकर, भूमिपुत्र वाघ,अँड.शकुंतला फाटक,ज्येष्ठ विधीज्ञ अँड.त्र्यंबक मनगिरे,ह.भ.प.महादेव महाराज आडसूळ,प्रा.शंकर कांबळे,सतपाल बचुटे,संजित हौसलमल,राहुल हौसलमल,संपादक सुभाष घोडके,पत्रकार राजेंद्र बारगुले, महेश फाटक,परमेश्वर खडबडे आदी मान्यवरांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाले.
  •  
    या प्रसंगी विश्वनाथ तोडकर यांनी भारत जोडो अभियानाच्या माध्यमातून संविधान व लोकशाही मोडीत काढू पाहणाऱ्या भाजपा सरकारला पाय उतार करण्यासाठी इंडियाच्या महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या ओमराजे निंबाळकर यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

  • या कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणातून भारत जोडो अभियानाचे माधवसिंग राजपूत यांनी महापुरुषांच्या जयंती विशेषांकातून महापुरुषांचे कार्य आणि त्यांचे विचार तळागाळापर्यंत पोचवण्याचे काम सा.साक्षी पावनज्योत करत असल्याचे सांगितले.
  • या प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन कार्यकारी संपादक प्रा.अविनाश घोडके यांनी केले तर कायदेशीर सल्लागार ॲड.शकुंतला फाटक यांनी आभार मानले.
    या कार्यक्रमाच्या सुरुवातीस संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले.
error: Content is protected !!