कळंब (राजेंद्र बारगुले ) – कृषि उत्पन्न बाजार समिती कळंबने आपले कार्यक्षेत्रात 46 सी.सी.टी.व्ही कॅमेरे निवीदा प्रक्रीया राबवून बाजार समितीने बा.स.च्या इतीहासात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविले आहेत.बाजार आवारात बारा ठिकाणी जंक्शन बसवून सदर जंक्शनच्या माध्यमातून वायरलेस सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविले असून सर्व कॅमेरे उच्च दर्जाचे व अंधारातही योग्य रितीने कामकाज करतात सी.सी.टी.व्ही कॅमेरे बाबत अचिंत्या रोबोटीक्स व ॲटोमेशन या पूरवठादाराने अतिशय वेगाने व चांगल्या पध्दतीने कामकाज केले आहे. होळकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक,ढोकी रोड व इतर बाजूने बाजार आवारात येणाऱ्या रस्त्यावर सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविले असून बाजार आवारात सर्व रस्ते,दुकाने नजर कैदेत घेतलेले आहेत यामुळे बाजार आवारात होनाऱ्या चोऱ्यावर नजर ठेवली जानार आहे बाजार आवारात येणारा सर्व शेतमाल सी.सी.टी.व्ही कॅमेरे च्या नजरकैदेत असनार आहे. बाजार आवारातील सी.सी.टी.व्ही कॅमेरे चे लिंक व पासवर्ड सर्व कर्मचारी व्यापारी यांना वाटप करण्यात येणार आहेत तसेच सर्व कामकाज सुरळीत करून सदर कॅमेरे लिंक मा.पोलीस स्टेशन यांना वितरीत केले जानार आहे जेणेकरून सर्व कामकाजावर करडी नजर ठेवली जाणार आहे.बाजार आवारात ज्या ठिकाणी सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविले आहेत त्या ठिकाणी आसलेल्या दुकानदाराने बाजार समितीच्या सदर कॅमेऱ्याची तोडफोड होउ नये म्हणून वैयक्तीक लक्ष देणे गरजे आहे जेणे करून गैरप्रकार करणाऱ्यांकडून कॅमेऱ्यांची तोडफोड होणार नाही याची नोंद घ्यावी.असे प्रशासनाकडून सर्वांना आवाहन करण्यात आले आहे.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले