August 9, 2025

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • “मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई.”
  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.08 एप्रिल रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 280 कारवाया करुन 2,10,950 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • धाराशिव ग्रामीण पोठाच्या पथकास आरोपी नामे-1)सुनिता संजय पवार, वय 45 वर्षे, रा. तुळजापूर जाणारे रोडलगत बी.एस.एन.एल. टॉवर जवळ धाराशिव जि. धाराशिव हे दि.08.04.2024 रोजी 14.55 वा. सु. तुळजापूर जाणारे रोडलगत अंदाजे 4,000 ₹किंमतीची 40 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • “रात्रगस्ती दरम्यान संशईत इसम ताब्यात”
  • येरमाळा पोलीस ठाणे : येरमाळा पो.ठा.चे पथक दि. 08.04.2024 रोजी 03.15 वा.सु. येरमाळा पोलीस ठाणे हद्दीत रात्रगस्तीस असताना दरम्यान येरमाळा ते पानगाव रोडवर हॉटेल अनुष्का चे बाजूस खड्यामध्ये अंधाराचा दबा धरुन बसलेल्या एका इसमास संशयावरुन पथकाने हाटकले. यावर त्यांची विचारपुस केली असता त्याने आपले नाव- सावळराम सायबा शिंदे, वय 35 वर्षे, रा. फुलेनगर पाथरी जि. परभणी 2) जयसिंग विठ्ठल नाईक वय 58 रा. माळीवाडा ता. पाथ्री जि. परभणी असे सांगीतले. पोलीसांनी अशा रात्री अवेळी फिरण्याचे कारण विचारले असता त्यांनी पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने ते माला विरूध्द गुन्हा करण्याच्या उद्देशाने तेथे फिरत असल्याचा पोलीसांचा संशय बळावल्याने त्यांना ताब्यात घेउन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र पोलिस कायदा कलम- 122 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
  • “रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद.”
  • कळंब पोलीस ठाणे :आरोपी नामे-1)रामलिंग नानासाहेब नवाडे, वय 40 वर्षे, रा. निवाडा ता. रेणापुर जि. लातुर हे दि.08.04.2024 रोजी 13.10 वा. सु. छत्रपती शिवाजी महाराज चौक कळंब येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना कळंब पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.वि. स. कलम 283 अन्वये कळंब पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
  • उमरगा पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)कलालदेव शहाजी पठ, वय 38 वर्षे, रा. गावसुद ता. जि.धाराशिव हे दि.08.04.2024 रोजी 13.15 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲटोरिक्षा क्र एमएच 25 ए.के. 1063 ही बसस्थानक समोरील एनएच 65 सोलापूर हैद्राबाद रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द मो.वा.का. कलम 185अन्वये उमरगा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • शिराढोण पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)अजित अंकुशराव लोमटे, रा. देवळाली ता. कळंब जि. धाराशिव हे दि.08.04.2024 रोजी 04.50 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 ए.पी. 7345 ही कोलेगाव ते शिराढोण रोडवर देवळाली श्विारात राजमाने यांचे आमराई जवळ मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द मो.वा.का. कलम 185अन्वये शिराढोण पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे
  • मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • तुळजापूर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-सचिन गणपती ननवरे, वय 45 वर्षे, रा. हंगरगा तुळ ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे हंगरगा तुळ शिवारातील शेतातील विहीर व बोर वरील अंदाजे 450 फुट केबल व दोन चंदनाची झाडे असा एकुण 44,000₹ किंमतीचा माल हा आरोपी नामे- सुरज शिंदे, 2) अजय काळे, इतर दोन इसम रा. हंगरगा पाटी ता. तुळजापूर यांनी दि. 06.04.2024 रोजी 22.00 ते 24.00 वा. सु. चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे सचिन ननवरे यांनी दि.08.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे 379, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • ढोकी पोलीस ठाणे : दि.05.02.2024 रोजी 09.30 वा. सु. दादा सरडे डीपी पळसप येथील शेत गट नं 264 मधील नउ पोलवरील लघुविद्युत वाहिणीची तार अंदाजे 30,000₹ किंमतीची ही अज्ञात व्यक्तीनी चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे प्रविण संदीपन माळी, वय 35 वर्षे, व्यवसाय नोकरी रा. पळसप ता. जि. धाराशिव हा.मु. मोदीनगर मुरुड ता. जि. लातुर यांनी दि.08.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे 379, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मारहाण.”
  • तुळजापूर पोलीस ठाणे :आरोपी नामे-1)सुनिल पवार, 2) सोमा पवार, 3) बाळु शिंदे, 4) विकी मंडोळे, 5) यलाप्पा मंडोळे, 6) लक्ष्मण पवार, सर्व रा. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.03.04.2024 रोजी नविन बसस्थानक समोर फिर्यादी नामे- गंगाराम अनिल हजारे, वय 32 वर्षे, रा. मातंगनगर शुक्रवार पेठ तुळजापूर जि. धाराशिव, यांना विठभट्टीवरील विटाचे भाउ ठरण्यासाठी बोलावून घेवून गैरकायद्याची मंडळी जमवून जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, स्टीलचा कोयता, रॉडने मारहाण करुन जखमी केले.तसेच फिर्यादीचे एक तोळ्याचे अंगठी व खिशातील 2,115₹ काढून घेतले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे गंगाराम हजारे यांनी दि.08.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे 327, 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 भा.दं.वि.सं. अ.जा.ज.अ. प्र. कायदा कलम 3(2)(व्हि.अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे :आरोपी नामे-1)समाधान रामकिसन पिंपळे. 2) गोरोबा विजयकुमार पिंपळे, 3) विजयकुमार पांडुरंग पिंपळे, 4)श्रीकृष्ण रामकिसन पिंपळे, सर्व रा. वाघोली ता. जि. धाराशिव यांनी दि. 04.04.2024 रोजी 10.00 ते 10.30 वा. सु. वाघोली येथे फिर्यादी नामे- विक्रम विश्वनाथ मगर, वय 54 वर्षे, रा. वाघोली ता. जि. धाराशिव यांना व त्यांचा मुलगा वैभव मगर यांना माझे येड्याचे प्रमाणपत्र काढले आहे असे म्हाणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी पाईप फायटरने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे विक्रम मगर यांनी दि.08.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे 325,324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • नळदुर्ग पोलीस ठाणे :आरोपी नामे-सतीश दत्तु मोहिते, वय 45 वर्षे, रा. आरळी खु ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 08.04.2024 रोजी सकाळी 07.00 वा. सु. आरळी खु येथे फिर्यादी नामे-पांडुरंग दत्तु मोहिते रा. आरळी खु ता. तुळजापूर जि. धाराशिव र यांना नमुद आरोपींनी जमीन पडीक पाडण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दाताने चावा घेवून जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे पांडुरंग मोहिते यांनी दि. 08.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे कलम 324, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • नळदुर्ग पोलीस ठाणे :आरोपी नामे-कृष्णा दत्ता सोमवंशी, 2) बाळासाहेब उर्फ शाहुराज सिद्राम सोमवंशी दोघे रा. आरळी खु ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 02.04.2024 रोजी 21.30 वा. सु. आरळी खु येथे फिर्यादी नामे- सुग्रीव ज्ञानोबा दरेकर, वय 45 वर्षे, रा. आरळी खु ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना शेतीच्या वादाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे सुग्रीव दरेकर यांनी दि. 08.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “रस्ता अपघात.”
  • बेंबळी पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- अमरसिंह विजयकुमार साळुंके पाटील, वय 27 वर्षे, सोबत वडील-विजयकुमार साळुंके, आई सविता साळुंके तिघे रा. आजनी खुर्द ता. अहमदपुर जि. लातुर हा.मु. शिक्षक कॉलनी जि. धाराशिव हे दि.01.04.2024 रोजी 09.00 वा. सु. महिंद्र कार क्र एमएच 25 एएस 1411 गाडीने बेंबळी उजनी रोडने लातुर येथे कर्यक्रमासाठी जात होते . दरम्यान धुत्ता शिवारात आल्यानंतर गाडीचा चालक आरोपी नामे- पंढरी विश्वनाथ येलगट्टे रा. आजनी खुर्द ता. अहमदपुर जि. लातुर यांनी त्याचे ताब्यातील कार हा हायगई व निष्काळजीपणे चालवून रस्त्यावरील खड्ड्यात आदळल्याने तीचा स्टेरिंग रॉड तुटून पल्टी झाल्याने सविता साळुंके या गंभीर जखमी होवून उपचार दरम्यान मयत झाल्या तर अमरसिंह साळुंके विजयकुामर साळुंके, हे किरकोळ व गंभीर जखमी झाले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे अमरसिंह साळुंके यांनी दि.08.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304(अ) सह कलम 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “विश्वासघात करणऱ्यांवर गुन्हा दाखल.”
  • कळंब पोलीस ठाणे : आरोपी नामे- आश्रुबा संपत्ती काळे, 2) नाना जालिंदर काळे, 3) विष्णु काळे, 4) रुक्मिणी जालिंदर काळे, 5) संजुबाई आश्रुबा काळे, 6) दादा विष्णु काळे सर्व रा. नांदुर ता. केज जि. बीड यांनी दि. 18.03.2024 रोजी 18.00 वा. सु. मार्केट यार्ड कळंब येथे फिर्यादी नामे- कमलाबाई राजा काळे, वय 65 वर्षे रा. मार्केट यार्ड कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांना विश्वासत घेवून नमुद आरोपींनी त्यांचे कडून 13 ग्रॅम वजनाची कालिका देवीची मुर्ती, पिवळे धातु असलेल्या, 3 ग्रॅम वजनाची भैरवनाथ देवाची मुर्ती, 3 तोळे वजनाची पांढऱ्या धतुचे देवाची मुर्ती परत आणुन देतो म्हणून घेवून जावून कमलाबाई काळे यांचा विश्वासघात केला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे कमलाबाई काळे यांनी दि. 08.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे कलम 406, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
error: Content is protected !!