कळंब ( जयनारायण दरक ) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कळंब शहरातील कार्यकर्ते पदाधिकारी नेते गण यांची बैठक भगवंत कॉम्प्लेक्स तांदळावाडी रोड कळंब येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष दत्ताजी तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली व मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार विक्रम काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. नुकत्याच सुरू झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट यांना धाराशिव जिल्ह्याची लोकसभेची जागा मिळालेली आहे आणि या जागेची उमेदवारी जिल्हा परिषद उपाध्यक्ष माननीय सौ.अर्चनाताई पाटील यांना देण्यात आली आहे या अनुषंगाने या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते.या बैठकीमध्ये महायुतीतर्फे कशाप्रकारे प्रचार करायचा व लोकांना महायुती ने केलेली कामे महायुतीने केलेला विकास जनतेपर्यंत कसा पोहोचवायचा यावर आमदार विक्रम काळे यांनी सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.या बैठकीस आवर्जून उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते भास्कर खोसे तसेच महायुतीतील भारतीय जनता पार्टीचे कळंब तालुकाध्यक्ष अजित पिंगळे,कळंब तालुका शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कळंब तालुका अध्यक्ष शिवाजी लकडे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक नागजी घुले,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब खंडागळे , ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष दत्ता तनपुरे , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा शहराध्यक्ष विक्रम चोंदे , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपशहर अध्यक्ष अभिजीत हौसलमल , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपजिल्हाध्यक्ष राहुल हौसलमल , अभिजीत कदम,सनी कांबळे ,बबलूदादा सौदागर ,हमीदभाई खान,नितीनजी ठाणआंबिर , अशोक गायकवाड,बबलूभाई शेख ,प्रणव सावंत व असंख्य असे कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित राहिले सर्व उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले