August 9, 2025

मंदिर उभारणी सोबत गावात अभ्यासिका केंद्र उभे करा ; अनेक नमृता अधिकारी होतील – आमदार कैलास पाटील

कळंब (सा वा ) गावातील तरुणांनी पुढाकार घेऊन मंदिरे उभारण्यासोबतच अभ्यासिका केंद्रे हि उभा करावित त्याला लागणारी पुस्तके आम्ही द्यायला तयार आहोत असे आवाहन आमदार कैलास घाडगे पाटील यांनी केले .
आंदोरा ता . कळंब येथील विविध प्रशासकीय स्तरावर स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत नम्रता पौळ (एस. टी. आय वर्ग 2 ), आरती देवकर ( तलाठी पदासाठी निवड ) तर उमेश करडे ( आरोग्य सेवक ) यांचा सत्कार आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला अध्यक्षस्थानी. सरपंच श्री. बळवंत तांबारे उपसरपंच दत्तात्रय तांबारे येडाई आयुष व्यसनमुक्तीचे संचालक डॉ. संदीप तांबारे एसबीआय चे मॅनेजर कदम संग्राम देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी प्रस्तावीक करताना डॉ संदिप ताबारे यांनी छोट्याशा गावात कुठल्याही सोयी सुविधा नसताना सुद्धा विद्यार्थी स्पर्धा परिक्षेतून पुढे जात आहेत या विद्यार्थ्याना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धा परिक्षेची पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी आपण गावकरी मिळून प्रयत्न करू व विद्यार्थ्याना प्रोत्साहन देवु असे आवाहन त्यांनी केले
तर आमदार पाटील पुढे बोलताना म्हणाले की गावात अभ्यासिका केंद्र उभारण्याची आज काळाची गरज आहे आज गावात अनेक नमृता व आरती आहेत पण त्यांना प्रोत्साहन व स्पर्धा परिक्षेची आवड निर्माण करणे गरजेचे आहे शिकणाऱ्या विद्यार्थ्याना प्रोत्साहन देण्यासाठी गावकऱ्यांनी पुढे येवून त्यांना मदत करणे हि काळाची गरज आहे .
या वेळी, ग्रामपंचायत सदस्य अशोक गाडे, राहुल लांडगे, राजाभाऊ कवडे दादा कदम,झुंबर बाराते राजेश लांडगे किरण कवडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मदन तांबारे यांनी तर आभार प्रदर्शन प्रदीप लोंढे यांनी केले.

error: Content is protected !!